Ramagiri Swarika, भारताची पहिली मायक्रो आर्टिस्ट हीने 4042 तांदळाच्या कणींवर लिहली भगवतगीता!
हैदराबादची 'लॉ' ची विद्यार्थिनी आणि मायक्रो आर्टीस्ट रामागिरी स्वरिका (Ramagiri Swarika)हीने चक्क तांदळाच्या दाण्यांवर भगवतगीता लिहण्याची किमया साधली आहे.
हैदराबादची 'लॉ' ची विद्यार्थिनी आणि मायक्रो आर्टीस्ट रामागिरी स्वरिका (Ramagiri Swarika)हीने चक्क तांदळाच्या दाण्यांवर भगवतगीता लिहण्याची किमया साधली आहे. सुमारे 4042 तांदळाच्या कणींचा वापर करून रामागिरी स्वरिकाने भगवतगीता (Bhagavad Gita) लिहली आहे. स्वरिकाने ANI या वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार यासाठी तिला 150 तासांपेक्षा अधिकचा वेळ लागला आहे. तर यापूर्वी तिने अशाप्रकारच्या हजारो कलाकृती घडवल्या आहेत. त्यामध्ये अजून एका गोष्टीची वाढ झाली आहे.
दरम्यान स्वरिकाने दिलेल्या माहितीनुसार 4000 पेक्षा अधिक तांदळाच्या कणींचा वापर करून भगवतगीता लिहण्याच्या तिच्या प्रयत्नांसाठी 150 तासांचा वेळ लागला. मायक्रो आर्ट बनवण्यासाठी अनेक गोष्टींचा वापर केला जातो. मात्र यासाठी तिने मॅग्निफाईंग ग्लास देखील न वापरता काम केले आहे. स्वरिका मिल्क आर्ट सोबतच पेपर कार्व्हिंग, तीळावरही पेंटिंग करते.
ANI Tweet
काही दिवसांपूर्वी स्वरिकाने केसाच्या बटीवर Preamble of the Constitution लिहली आहे. यासाठी तेलंगणाचे राज्यपाल तमिलिसाई साउंदराजन (Tamilisai Soundararajan)कडून तिचा सन्मान देखील करण्यात आला आहे. आता राष्ट्रीय स्तरावर अशाप्रकारे कामाची प्रशंसा होत असताना, पाठबळ मिळत असताना भविष्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील ही कलाकृती घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करेन असा विश्वास स्वरिकाने बोलून दाखवला आहे.
2019 साली स्वरिकाला Delhi Cultural Academy चा नॅशनल अवॉर्ड देऊन तिची ओळख India's first micro-artist अशी करण्यात आली आहे. स्वरिकाला भविष्यात न्यायाधीश होण्याचे स्वप्न आहे. तसेच तिला महिलांसाठी आदर्श देखील व्हायचं आहे.