Tejas Thackeray's Dance in Anant Radhika Sangeet: अनंत अंबानी-राधिका मर्चंट च्या संगीत सोहळ्यामध्ये तेजस ठाकरे देखील थिरकले 'Yeh Ladka Hai Allah' गाण्यावर (Watch Video)

सारा अली खान, अनन्या पांडे, वीर पहाड़िया सोबत शाहरूख-काजेलच्या कभी खुशी कभी गम चित्रपटातील 'ये लडकी हाय अल्लाह...' गाण्यावर तेजस देखील नाचताना दिसले आहेत.

Tejas Thackeray | X

अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चंट (Radhika Marchant)  ही जोडी 12 जुलै दिवशी मुंबई मध्ये विवाहबंधनामध्ये अडकणार आहे. अनंत आणि राधिकाच्या लग्नापूर्वीच्या विधींना सुरूवात झाली आहे. NMACC मध्ये नुकताच त्यांचा संगीत सोहळा रंगला आहे. दरम्यान या संगीत सोहळ्याला जस्टीन बिबरने चार चांद लावले होते पण या संगीत सोहळ्याचे समोर आलेल्या व्हिडिओ मध्ये स्टेज वर तेजस ठाकरे (Tejas Thackeray)  देखील थिरकल्याचं पहायला मिळालं आहे.

अनंत राधिकाच्या मित्र मंडळींच्या एका ग्रुप डान्स मध्ये तेजस ठाकरे देखील मागच्या रांगेत बॉलिवूडच्या गाण्यावर थिरकताना दिसले आहेत. सारा अली खान, अनन्या पांडे, वीर पहाड़िया सोबत शाहरूख-काजेलच्या कभी खुशी कभी गम चित्रपटातील 'ये लडकी हाय अल्लाह...' गाण्यावर तेजस देखील नाचताना दिसले आहेत. तेजसच्या डान्सचा व्हिडिओ देखील सध्या सोशल मीडीयात तुफान वायरल होत आहे. (हेही वाचा -Anant-Radhika Wedding: जस्टिन बीबर मुंबईत पोहोचला; अनंत-राधिकाच्या संगीत फंक्शनमध्ये करणार खास परफॉर्म, जाणून घ्या 'किती' घेतली फी)

तेजस ठाकरे यांचा डांस

 

View this post on Instagram

 

A post shared by Manav Manglani (@manav.manglani)

संगीत सोहळ्यात मुकेश अंबानींंच्या नाती सोबत रमलेले तेजस ठाकरे

View this post on Instagram

A post shared by Manav Manglani (@manav.manglani)

तेजस ठाकरे हे एरवी वन्यजीवांमध्ये रमणारे, राजकीय सभांमध्ये एकटेच लांब राहून उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांना पाठिंबा देताना समोर आले आहेत पण पहिल्यांदाच त्यांचा थिरकताना अंदाज पाहून अनेकांना त्यांची एक वेगळी बाजू पहिल्यांदाच पहायला मिळाली आहे. दरम्यान अनंत आणि राधिका यांच्या संगीत सोहळ्यात त्यांनी आई रश्मि ठाकरे यांच्यासोबत हजेरी लावली होती त्यावेळी त्यांनी रॉयल ब्लू रंगातील खास शेरवानी परिधान केली होती.

अनंत आणि राधिकाच्या हळदीच्या कार्यक्रमाला काल उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे यांच्यासोबत आदित्य ठाकरेंनी हजेरी लावली होती.