Teachers's Day Funny Memes: शिक्षक दिनानिमित्त जुन्या आठवणी रिफ्रेश करणारे फनी मीम्स आणि जोक्स सोशल मीडियावर व्हायरल!

पण सध्या त्यावर मीम्स बनवले जातात आणि हे मीम्स सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होतात.

Teachers' Day memes (Photo Credits: Twitter)

आज 5 सप्टेंबर शिक्षक दिन. शिक्षकांसाठी खास असलेल्या या दिवशी तुम्ही तुमच्या शिक्षकांना शुभेच्छा दिल्या असतील. यंदा शाळा-महाविद्यालयं बंद असल्याने नेहमीप्रमाणे शिक्षक दिन साजरा करता आला नसेल. परंतु, सध्या डिजिटल युगात सोशल मीडियाच्या विविध माध्यमातून तुम्ही शिक्षकांना नक्कीच शुभेच्छा संदेश पाठवू शकता. शाळा आणि शाळेतील शिक्षक हा आपल्या आयुष्यातील अभिवाज्य भाग असतो. एखादी व्यक्ती कितीही मोठी झाली, उच्च पदी पोहचली तरी शाळेच्या आठवणी त्या व्यक्तीच्या मनात कायम अभाधित असतात. त्यामुळे शाळेतील शिक्षकांशी जुळलेला ऋणानुबंध मनात कायम टिकतो. (शिक्षक दिन 2020 निमित्त सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे विचार WhatsApp, Facebook वर शेअर करत शिक्षकांना म्हणा धन्यवाद)

शाळेतील शिक्षकांचे किस्से, त्यांचे ओरडणे, रागावणे, शिक्षा करणे त्या वयात गंभीर वाटत असले तरी मोठे झाल्यावर त्या आठवणी खास होतात. एखाद्या शिक्षकाची स्टाईल, बोलण्याची लकब, मस्करीत त्यांना मारलेली हाक, ठेवलेली टोपणनावे यामुळे शालेय जीवन मजेशीर होते यात वादच नाही. पण सध्या त्यावर मीम्स बनवले जातात आणि हे मीम्स सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होतात. आज शिक्षक दिनानिमित्त व्हायरल होणारे भन्नाट मीम्स...

पहा व्हायरल मीम्स:

हे फनी मीम्स तुम्हाला तुमच्या शाळा-कॉलेजची आठवण करुन देतील. जुन्या आठवणी नव्याने ताज्या होतील आणि नकळत चेहऱ्यावर हसू फुलेल. हसता हसता कदाचित डोळ्यांच्या कडाही पाणावतील. तुमच्या मित्रपरीवारासोबत हे फनी मीम्स शेअर करा आणि त्यांनाही हसवा.