Tamil Nadu Controversy: मंदिराच्या बॅनरवर मिया खलिफाचा फोटो टाकल्याने नवा वाद; पोस्टरचा व्हिडिओ व्हायरल
त्या गावातील मपिल्लई विनयागर मंदिरात नागथम्मन आणि चेल्लीअम्मनची मंदिरे आहेत. या मंदिरात 9 ऑगस्ट रोजी माँ अम्मान म्हणजेच पार्वती मातेचा ओटीभरण सोहळा होणार आहे.
धार्मिक पोस्टरवर अमेरिकन पॉर्न स्टार मिया खलिफाचा फोटो वापरल्यावर नवीन वाद निर्माण झाला आहे. तामिळनाडूमधील कांचीपुरम येथील ही धक्कादायक घटना समोर आली आहे. हे पोस्टर सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले असून चर्चेचा विषय बनला आहे. (हेही वाचा - Theft For GF Birthday: गर्लफ्रेंडला खूश करण्यासाठी चोरी! नववीच्या विद्यार्थ्याने आईचे दागिने विकून प्रेयसीला गिफ्ट केला आयफोन)
कांचीपुरमजवळील कुरुविमलाई या गावात हा विचित्र प्रकार घडला आहे. त्या गावातील मपिल्लई विनयागर मंदिरात नागथम्मन आणि चेल्लीअम्मनची मंदिरे आहेत. या मंदिरात 9 ऑगस्ट रोजी माँ अम्मान म्हणजेच पार्वती मातेचा ओटीभरण सोहळा होणार आहे. या सोहळ्यासाठी भाविकांच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी बॅनर लावण्यात आले आहेत. त्यातील एका पोस्टरवर अमेरिकन पॉर्न स्टार मिया खलिफाचा फोटो लावण्यात आला आहे. मिया खलिफा डोक्यावर कलश दिसत असून तिने पिवळा ड्रेस परिधान केल्याचं दिसत आहे.
पाहा व्हिडिओ -
कुरुविमलाई येथील नागथम्मन आणि सेल्ली अम्मन मंदिरांमध्ये आदी उत्सव भव्य पद्धतीने साजरा करण्यासाठी मोठ्या कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी ठिकठिकाणी लाईटिंग आणि होर्डिंग्ज लावून आणि लोकांना आमंत्रित करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाचा आणि मिया खलिफाच्या फोटोचा काही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे.