Swiggy-Wide Horse-Hunt! भरपावसात घोड्यावरून फूड डिलेव्हरी करायला निघालेल्या डिलेव्हरी बॉयला शोधणार्यासाठी स्विगी ने जाहीर केले बक्षीस!
स्विगी कडून आता या घोडेस्वार डिलिव्हरी बॉयला शोधणार्या व्यक्तीला 5 हजार रूपये दिले जातील असं जाहीर करण्यात आलं आहे.
सध्या सोशल मीडीयामध्ये एका स्विगी (Swiggy) डिलिव्हरी बॉयचा व्हिडिओ वायरल होत आहे. या व्हिडिओत तो घोड्यावरून डिलिव्हरी देण्यासाठी जात असल्याचं पहायला मिळालं आहे. मुंबईच्या पावसात त्याने फूड डिलेव्हरीसाठी घोडा निवडल्याने त्याची चर्चा आहे. व्हिडिओत त्याच्या पाठीवर स्विगीची बॅग आहे. सध्या त्याच्यावर कामाप्रती ओढा पाहून कौतुकाचा वर्षाव होत आहे. दरम्यान स्विगीनेही या वायरल व्हिडिओची दखल घेतली आहे. पण त्यांनाही हा मुलगा नेमका कोण? याची माहिती नाही.
स्विगी कडून आता या घोडेस्वार डिलिव्हरी बॉयला शोधणार्या व्यक्तीला 5 हजार रूपये दिले जातील असं जाहीर करण्यात आलं आहे. त्याबाबतच “Who is this gallant young star?" ट्वीट स्विगीने केले आहे.
पहा ट्वीट
'Just a vibe'या युट्युब युजरचा short video clip वायरल झाला आहे.नक्की वाचा: Shocking! व्यक्तीने 23 लाखांना खरेदी केला 'काळा घोडा'; घरी आणल्यानंतर समोर आले धक्कादायक सत्य, गुन्हा दाखल.
2014 मध्ये Swiggy ची सुरूवात झाली. ती ग्राहकांना 500 हून अधिक शहरांमध्ये 2,00,000 रेस्टॉरंट भागीदार आणि स्टोअरशी जोडते. त्याची क्विक कॉमर्स किराणा सेवा Instamart 29 शहरांमध्ये आहे. डिसेंबर 2021 मध्ये, स्विगीने Instamart मध्ये $700 दशलक्ष गुंतवणूकीची घोषणा केली. गेल्या महिन्यात, Swiggy ने Dineout, एक डायनिंग आउट आणि रेस्टॉरंट टेक प्लॅटफॉर्म, जवळजवळ $200 दशलक्ष मध्ये विकत घेतले.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)