पितृदिन 2020 निमित्त वाळू शिल्पकार सुदर्शन पटनायक यांनी साकारलं खास सॅन्ड आर्ट

प्रसिद्ध वाळूशिल्पकार सुदर्शन पटनायक यांनी ओडिशामध्ये पुरी समुद्र किनारी खास सॅन्ड आर्ट साकारलं आहे. 'हॅप्पी फादर्स डे, पापा' या मेसेज सह त्यांनी खास सॅन्ड आर्ट बनवलं आहे.

पितृदिन 2020  निमित्त वाळू शिल्पकार सुदर्शन पटनायक यांनी साकारलं खास सॅन्ड आर्ट
Happy Fathers Day | Photo Credits: Twitter/ sudarsansand

जून महिन्यातील तिसरा रविवार हा जगभरात 'पितृदिन' (Father's Day) म्हणजेच फादर्स डे म्हणून साजरा केला जातो. यंदा कोरोना व्हायरस संकट आणि लॉकडाऊनच्या नियमांमुळे घरच्या घरीच अनेकांनी वडिलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी विविध सरप्राईजचं प्लॅनिंग केलं असेल. पण आजच्या दिवसांचं औचित्य साधून प्रसिद्ध वाळूशिल्पकार सुदर्शन पटनायक (Sudarsan Pattnaik) यांनी ओडिशामध्ये पुरी समुद्र किनारी खास सॅन्ड आर्ट साकारलं आहे. 'हॅप्पी फादर्स डे, पापा' या मेसेज सह त्यांनी खास सॅन्ड आर्ट बनवलं आहे. यामध्ये हार्ट आणि त्याच्यापुढे मास्क परिधान केलेले आणि एकमेकांसमोर असलेली बाप-लेकाची जोडी साकारण्यात आली आहे. Father's Day 2020 Wishes: पितृदिन निमित्त मराठी शुभेच्छा, Quotes, Images, Messages, Greetings शेअर करून द्या फादर्स डे च्या शुभेच्छा.

पद्मश्री विजेते सुदर्शन पटनायक अनेक महत्त्वाच्या घटना, सण- समारंभ ते दिग्गजांच्या कार्याला सलाम करण्यासाठी आपल्या सॅन्ड आर्टच्या माध्यामातून भावना व्यक्त करतात. आज त्यांनी फादर्स डे सोबतच जागतिक योगा दिनाच्या निमित्तानेही खास सॅन्ड आर्ट ट्विटर अकाऊंटच्या माध्यमातून शेअर केले आहे. इथे पहा त्याची खास झलक

पितृदिना निमित्त सॅन्ड आर्ट

आज जगभर वडिलांना धन्यवाद म्हणण्यासाठी विविध सरप्राईज प्लॅन केले जात आहेत. जंगी सेलिब्रेशन होत नसलं तरीही लॉकडाऊनचे नियम पाळत हे सएलिब्रेशन सुरू आहे.

(The above story first appeared on LatestLY on Jun 21, 2020 12:32 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).