Student Jumps From Third Floor Of College Building: आसाममध्ये शिक्षक दिनाच्या कार्यक्रमात विद्यार्थ्याची कॉलेजच्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी, पहा व्हिडिओ
शिक्षक दिन सुरू असताना विद्यार्थ्याने संस्थेच्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारली. व्हिडिओमध्ये विद्यार्थी खिडकीबाहेरच्या जागेत उभा असलेला दिसत आहे. तसेच यावेळी इमारतीच्या बाजूला 200 हून अधिक विद्यार्थ्यांचा जमाव जमलेला दिसत आहे.
Student Jumps From Third Floor Of College Building: शिक्षक दिनाच्या (Teachers' Day) दिवशी आसाममधील एका महाविद्यालयाच्या इमारतीवरून विद्यार्थ्याने उडी मारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना आसाम (Assam) मधील पाठशाला येथील अनुंदोराम बोरूह अकादमीमध्ये घडली. शिक्षक दिन सुरू असताना विद्यार्थ्याने संस्थेच्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारली. व्हिडिओमध्ये विद्यार्थी खिडकीबाहेरच्या जागेत उभा असलेला दिसत आहे. तसेच यावेळी इमारतीच्या बाजूला 200 हून अधिक विद्यार्थ्यांचा जमाव जमलेला दिसत आहे.
यावेळी घटनास्थळी शिक्षकही उपस्थित होते. तरुण विद्यार्थ्याने जोरात धावत येऊन नंतर उडी मारली. त्यानंतर तो जमिनीवर पडला. काही वेळासाठी संपूर्ण परिसरात या घटनेमुळे तणावाचे वातावरण पसरलेले दिसून येते. विद्यार्थ्याने हे कठोर पाऊल का उचलले? याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. (हेही वाचा -Viral video: तरुणांमध्ये रील्सची क्रेझ, बोलेरो कारवर स्टंट करताना तरुण दिसला, व्हिडीओ व्हायरल)
विद्यार्थ्याची कॉलेजच्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी, पहा व्हिडिओ -
During Teachers' Day celebrations on Thursday, a student from Anandaram Baruah Academy in Pathsala,Assam, jumped from the third floor of the school building.Currently, he is undergoing treatment.The reasons behind the student's drastic action remain unclear at this time.#viral pic.twitter.com/5zyveriZE6
— Sasangka Talukdar (@Sasanka140) September 6, 2024
दरम्यान, सोशल मीडियावर विद्यार्थ्यांच्या या धक्कादायक कृतीचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. तथापी, नेटकऱ्यांनी या व्हिडिओला प्रतिक्रिया देताना विद्यार्थ्याच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. 'X' पोस्टवरील मथळ्यानुसार त्याला परिसरातील रुग्णालयात हलवण्यात आले असून सध्या त्याच्यावर आवश्यक उपचार सुरू आहेत. मात्र, त्यांला या घटनेत गंभीर दुखापत झाली आहे.
(The above story first appeared on LatestLY on Sep 06, 2024 05:37 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

