बर्मिघम एअरपोर्टवर वादळात अडकलेल्या विमानाचं 'असं' झालं लॅडिंग; पहा थरारक व्हिडिओ

या वादळामुळे यूरोपमधील अनेक देशाचं मोठं नुकसान झालं होतं. या वादळाची तीव्रता लक्षात घेता तेथील प्रशासनाने रेल्वे सेवा तसेच अनेक विमान उड्डाणे रद्द केले होते. अशाच एका विमान उड्डाणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे.

Aircraft takeoff Watch the thrilling video (PC - You Tube)

यूरोपमध्ये काही दिवसांपूर्वी 'कियारा' या चक्रीवादळाने (Storm Ciara) धुमाकूळ घातला होता. या वादळामुळे यूरोपमधील अनेक देशाचं मोठं नुकसान झालं होतं. या वादळाची तीव्रता लक्षात घेता तेथील प्रशासनाने रेल्वे सेवा तसेच अनेक विमान उड्डाणे रद्द केले होते. अशाच एका विमान उड्डाणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये बर्मिघम एअरपोर्टवर वादळात अडकलेल्या विमानाचं लॅडिंग करतानाची दृश्य टिपण्यात आली आहेत. हा विमानाचा लॅडिंगचा थरारक व्हिडिओ पाहून अंगावर शहारे येत आहेत.

भयंकर वादळात विमान चालकाने प्रवाशांचे प्राण कशा प्रकारे प्राण वाचवले आहेत, हे या व्हिडिओतून दिसतं. बर्मिघम एअरपोर्टवर वादळात एक विमान टेक ऑफ करत होतं. मात्र, तेवढ्यात जोरदार वारा सुरू झाला. त्यामुळे विमान काही वेळासाठी हवेतच तरंगत होतं. हे विमान हवेमुळे सतत हालत होते. हा व्हिडिओ पाहून विमानात बसलेल्या प्रवाशांचं काय झालं असेल? याचा प्रत्यय येतो. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतं आहे. (हेही वाचा - सविता भाभी... तू इथंच थांब! पुण्याच्या चौकात झळकले नवे पोस्टर; शहरभर चर्चेला उधान)

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, हे विमान बेलफास्ट या शहरातून येत होतं. मात्र, क्यार वादळामुळे विमानाला बर्मिंघम एअरपोर्टवर लॅन्ड करावं लागलं. त्यानंतर काही वेळात या विमानाने पुन्हा टेक ऑफ केलं. मात्र, वादळाची तीव्रता वाढल्याने विमानाच्या पायलटने हे विमान पुन्हा लँड केलं. पायलटच्या प्रसंगावधानामुळे या विमानातील सर्व प्रवाशांचा जीव वाचला. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओवर नेटीझन्सनी विमानाच्या पायलटचं कौतुक केलं आहे.