लोकप्रिय Google डूडल गेम: गुगल डुडलच्या सिरीजमधील लोकप्रिय Garden Gnomes गेम पुन्हा युजर्सच्या भेटीला!
जर्मनी मधील गार्डन डे च्या सन्मानार्थ या गेमची निर्मिती करण्यात आली होती.
कोरोना व्हायरस लॉकडाऊनच्या काळात गुगलने डुडलच्या माध्यमातून गुगलचे लोकप्रिय गेम्स युजर्सच्या भेटीला आणले आहेत. त्यातील आज पाचवा गेम खेळण्याची संधी युजर्संना मिळणार आहे. Garden Gnomes असे या लोकप्रिय गेमचे नाव आहे. कोरोना व्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या जवळपास संपूर्ण जग लॉकडाऊनच्या स्थितीत आहे. त्यामुळे अनेक लोक घरात कैद आहेत. घरात 24 तास काय करायचे हा प्रश्न अनेकांना पडला आहे. विशेषतः लहान मुलांचे मनोरंजन कसे करायचे हे मोठे चॅलेंज आहे. तुमचा आमचा हा प्रश्न गुगलने लोकप्रिय गेम्स डुडलच्या माध्यमातून साकारत सोडवण्याचा प्रयत्न केला आहे.
Garden Gnomes हा गेम दोन वर्षांपूर्वी 10 जून 2018 मध्ये लॉन्च करण्यात आला होता. जर्मनी मधील गार्डन डे च्या सन्मानार्थ या गेमची निर्मिती करण्यात आली होती. या उत्सवामध्ये लोकं आपल्या गार्डनमध्ये Garden Gnomes सजवून ठेवत असतं. Garden Gnomes हे छोट्या आकाराच्या बगिचा सजावजीच्या मुर्त्या आहेत. या मुर्तींना सफेद दाढी आणि लाल टोकदार टोपी असते. 1840 मध्ये युकेच्या गार्डन पार्टीजमध्ये या Garden Gnomes चा पहिल्यांचा वापर करण्यात आला आणि तेव्हापासून त्यांची लोकप्रियता वाढू लागली. (लोकप्रिय Google डूडल गेम: गुगलचा प्रसिद्ध 'Coding' गेम खेळा आणि घरीच रहा)
Garden Gnomes हा गुगल डूडच्या गेम सिरीजमधील पाचवा गेम असून हा मोजक्याच देशात उपलब्ध आहे. ब्राझील, अमेरिका, युके, ऑस्ट्रेलिया, जपान, न्युझीलंड, साऊथ आफ्रीका, रशिया , केनिया, पाकिस्तान, श्रीलंका, बांग्लादेश, नेदरलँड, घाना, युगांडा, सेनेगल, नायजेरिया आणि टान्झानिया या देशात उपलब्ध आहे. हे गुगल डूडल भारतात उपलब्ध होणार नाही. परंतु, गुगल डुडलच्या गेम सिरीजमधील इतर गेम्सचा आनंद तुम्ही भारतातून नक्कीच घेऊ शकता.