SSC ने बनवला ‘Tier-0’,ज्याला पार केल्यानंतरच इच्छुक उमेदवार करू शकतात सरकारी नोकरीसाठी अर्ज? पहा PIB Fact Check चा खुलासा

स्टाफ सिलेक्शन कमिशनकडून घेतले जाणारे सारे निर्णय त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर म्हणजेच ssc.nic.in वर वेळोवेळी अपडेट केले जातात.

Fake News on SSC (Photo Credits: Twitter, PIB)

सध्या सोशल मीडियामध्ये फेकन्यूजचा सुळसुळाट फार आहे. दरम्यान स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्येही सध्या सर्वरवर वाढता दबाव पाहता आता त्यांनी 'Tier-0'ची निर्मिती केली आहे आणि जे इच्छुक उमेदवार अर्ज करणार आहेत त्यांनी 'Tier-0' क्वालिफाय केल्यानंतरच त्यांचा नोकरीसाठी विचार केला जाऊ शकतो असं म्हटलं आहे. पण ही खोटी बातमी आहे. पीआयबीने आज त्यावर उत्तर देताना एसएससी कडून अशाप्रकारचे कोणतेही नोटिफिकेशन काढण्यात आलेले नाही असे म्हटलं आहे. दरम्यान या बातमीमुळे इच्छुक उमेदवारांच्या मनात काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं.

दरम्यान फेक न्यूज बाबत खुलासा करण्यासाठी सातत्याने पीआयबी फॅक्ट चेक ट्वीटर अकाऊंटवर माहिती अपडेत केली जाते. त्यामध्ये देण्यात आलेल्या माहितीमध्ये ही 'Tier-0'बाबतचे वृत्त खोटे असल्याचं सांगण्यात आले आहे. एसएससीने असे नोटिफिकेशन जारी केलेले नाही. दरम्यान स्टाफ सिलेक्शन कमिशनकडून घेतले जाणारे सारे निर्णय त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर म्हणजेच ssc.nic.in वर वेळोवेळी अपडेट केले जातात.

PIB Fact Check Tweet

कोरोना वायरस संकटकाळामध्ये अनेकदा सोशल मीडीयामध्ये खोट्या बातम्या झपाट्याने पसरल्या आहेत. त्यामुळे अफवांना पेव फूटत होतं. सरकराने नागरिकांना आवाहन केले आहे की कोणत्याही खोट्या बातम्या, अफवांवर विश्वास ठेवू नका. सरकारी यंत्रणांकडून दिली जाणारी माहिती अधिकृत संकेतस्थळांवर ती तपासून पहा.