गगनयान मिशन: चंद्रावर जाणा-या भारतीय अंतराळवीरांसाठी प्रयोगशाळेत बनवले जात आहे खास पद्धतीचे जेवण; व्हेज पुलाव, व्हेज रोल्ससह अनेक पदार्थांचा समावेश
तसेच हे जेवण गरम करण्यासाठी फूड हिटर्ससुद्धा दिले जाणार आहेत. त्याशिवाय पिण्यासाठी पाणी आणि ज्यूस सुद्धा दिले जाईल. DRDO ने या सर्व गोष्टी झिरो ग्रॅव्हिटीमध्ये खाता येतील अशा पद्धतीने बनवले आहे.
भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्त्रो) 2022 मध्ये पहिले आपले मानवासहित असलेले अंतराळ यान चंद्रावर पाठवणार आहे. 2021 हे गगनयान मिशन (Gaganyaan Mission) लाँच केले जाणार आहे. या प्रवासाठी भारतातून 4 लोकांची निवड करण्यात आली आहे. हे 4 अंतराळवीर हे यान चंद्रावर नेणार आहेत. मानवासहित पाठविण्यात येणारे हे पहिले अंतराळयान असल्यामुळे त्याची तितकीच तयारी सुरु आहे. अंतराळवीर या अद्भूत प्रवासासाठी या महिन्याच्या तिस-या आठवड्यात विशेष प्रशिक्षण घेणार आहे. यावेळी लोकांना सर्वात मोठा प्रश्न पडतो ते अंतराळात हे अंतराळवीर नेमकं काय खाणार वा काय पिणार? या प्रश्नाचे उत्तर आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. डीआरडीओ ने या लोकांसाठी विशिष्ट पद्धतीच्या जेवणाची यादी तयार केली आहे. मैसुरच्या प्रयोगशाळेमध्ये याची तयारी केली जाणार आहे.
DRDO ने अंतराळवीरांसाठी अंड्याचे रोल, व्हेज रोल, इडली, मूगाची डाळ, हलवा आणि व्हेज पुलाव ठेवण्यात आले आहे. तसेच हे जेवण गरम करण्यासाठी फूड हिटर्ससुद्धा दिले जाणार आहेत. त्याशिवाय पिण्यासाठी पाणी आणि ज्यूस सुद्धा दिले जाईल. DRDO ने या सर्व गोष्टी झिरो ग्रॅव्हिटीमध्ये खाता येतील अशा पद्धतीने बनवले आहे.
गगनयान फूड मेन्यूवर ANI चे ट्विट
ISRO चे मुख्य सिवन ने सांगितले की, मिशन गगनयानसाठी 4 अंतराळवीरांची निवड करण्यात आली आहे जे भारतीय वायुसेना सदस्य आहेत.
हेदेखील वाचा- ISRO च्या चंद्रयान 2 या मिशनचा हिस्सा असणाऱ्या प्रोजेक्ट डारेक्टर एम वनिता चंद्रयान 3 मधून बाहेर
ट्विटर वर यूजर्सची प्रतिक्रिया
स्वस्त पेपर बोट
MDH वाले काका
मॅगी आणि वडापाव
नारळाची चटणी
बिर्याणी
खमण, ढोकळा आणि थेपला
नो समोसा, नो कचोरी
गगनयान मानवाला अंतराळात घेऊन जाणारे पहिले यान असेल. या गगनयानचे ब-यापैकी काम पूर्ण झाले आहे. गगनयान मिशन अंतर्गत हे यात्री 7 दिवस पृथ्वीच्या लो-ऑर्बिटला गोल फिरेल.