कैलिफोर्निया: Pet Sitter ने ग्राहकाच्या घरी केला सेक्स; Doggie Cam मध्ये कैद झाला सर्व प्रकार
रोजी ब्राऊन हिच्या घरातील प्राण्यांची देखरेख करण्याचे काम केसी ब्रेंगल करायची. प्राण्यांची देखभाल करण्याच्या कामी ब्राऊन ही केसी हिची सेवा घेत असे.
कैलिफोर्निया येथील रोजी ब्राऊन (Rosie Brown) नावाच्या महिलेला आपल्या Pet Sitter च्या कृत्याने चांगलाच धक्का बसला आहे. पेट सीटरने सेक्स करण्यासाठी रोजी ब्राऊन हिच्या घराचा वापर केला. केसी ब्रेंगल असे या पेट सीटरचे नाव आहे. ब्रेंगल हिने आपल्या बॉयफ्रेंडला आपल्या ग्राहकाच्या घरी बोलावले आणि त्याच्यासोबत सेक्स केला. हा सर्व प्रकार डॉगी कॅमेऱ्यात कैद झाला होता. या कॅमेऱ्याचे फुटेज पाहिल्यानंतर ब्राऊनला आपल्या पेट सीटरच्या कृत्याबाबत समजले.
प्राप्त माहितीनुसार, कैलिफोर्निया येथील रोजी ब्राऊन नावाची महिला ही Pet Sitter रोजी ब्राऊन हिची ग्राहक होती. रोजी ब्राऊन हिच्या घरातील प्राण्यांची देखरेख करण्याचे काम केसी ब्रेंगल करायची. प्राण्यांची देखभाल करण्याच्या कामी ब्राऊन ही केसी हिची सेवा घेत असे.
दरम्यान, रोजी ब्राऊन नावाच्या महिलेने म्हटले आहे की, वयाच्या 26 व्या वर्षी केसी ब्रेंगल हिला पेट अॅप वैग (Wag) वर 5 स्टार रेटींग मिळाले होते. त्या काळात ब्रेंगल हिने आपल्या ग्राहकाच्या (रोजी ब्राऊन) हिच्या घराचा वापर आपल्या बॉयफ्रेंड सोबत सेक्स करण्यासाठी केला होता. हा सर्व प्रकार डॉगी कॅमेऱ्यात कैद झाला. या कॅमेऱ्यात चित्रीत झालेल्या प्रकारात एक व्यक्ती ब्रेंगल हिच्यासोबत रोजी ब्राऊन हिच्या बेडरुममधये विवस्र् आवस्थेत दिसतो आहे. तसेच, दोघे सेक्स करतानाही दिसत असल्याचा दावा संबंधीत महिलेने केला आहे. (हेही वाचा, Youtube वर प्रसिद्धीसाठी त्याने बहिणीला किस केल्यानंतर, आता आईसोबतचा Lip to Lip Kiss व्हायरल (Video))
ब्राऊन हिने केलेले सर्व आरोप केसी ब्रेंगल हिने फेटाळून लावले आहेत. ब्रेंगल हिचे म्हणने आहे की, असा कोणताही प्रकार आपण केला नाही. आपल्यावर केवळ आरोप केले जात आहेत.
दरम्यान, रोजी ब्राऊन ही पेनी आणि डेजी नावाच्या दोन कुत्र्यांना केसी ब्रेंगल हिच्याकडे सोपवून आपल्या चुलत भावाच्या विवाहासाठी लुइसियाना येथे गेली होती. आपल्या प्राण्यांना अन्न योग्य वेळी मिळावे यासाठी ब्राऊन हिने ब्रेंगल हिची नेमणूक केली होती. केसी ब्रेंगल हिला(Casey Brengle) पाळीव प्राण्यांची देखरेक करण्याकरीता 315 डॉलर इतक्या मोबदल्यावर नेमले होते.