ऑस्ट्रेलियातील रिपोर्टरच्या खांद्यावर अचानक पडला साप, त्यानंतर जे घडलं ते तुम्हीचं पहा; Watch Video

विशेषत: ऑन एअर रिपोर्टरसाठी हे अत्यंत जोखमीचं काम असतं. फिल्डवर असताना कोणत्याही परिस्थितीत बातमीदाराला आपली जीव धोक्यात टाकून ती बातमी कव्हर करावी लागते. अनेकदा दंगल, आग, अतिवृष्टी, आदीसारख्या घटना घडतात. मात्र, पत्रकार आपल्या जीवाची परवा न करता या बातम्या कव्हर करत असतो. अशीच एक घटना ऑस्ट्रेलियामध्ये एका महिला रिपोर्टरसोबत घडली आहे. सध्या सोशल मीडियावर या महिला रिपोर्टरचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Snake falls on reporters shoulder(फोटो क्रेडिट्स: YouTube)

पत्रकारीता करणं हे काही सोपे काम नाही. विशेषत: ऑन एअर रिपोर्टरसाठी हे अत्यंत जोखमीचं काम असतं. फिल्डवर असताना कोणत्याही परिस्थितीत बातमीदाराला आपली जीव धोक्यात टाकून ती बातमी कव्हर करावी लागते. अनेकदा दंगल, आग, अतिवृष्टी, आदीसारख्या घटना घडतात. मात्र, पत्रकार आपल्या जीवाची परवा न करता या बातम्या कव्हर करत असतो. अशीच एक घटना ऑस्ट्रेलियामध्ये एका महिला रिपोर्टरसोबत घडली आहे. सध्या सोशल मीडियावर या महिला रिपोर्टरचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

सारा कॅवटे (Sarah Cawte) असं या ऑस्ट्रेलियन महिला रिपोर्टरचं नाव आहे. ही महिला रिपोर्टर ऑन एअर रिपोर्टिंग करत असताना तिच्या खांद्यावर अचानक एक साप पडला आणि या सापाने माईकला दंश करण्याचा प्रयत्न केला. या सर्व प्रकारामुळे ही महिला थोडीशी घाबरली. मात्र, तिने शुट थांबवलं नाही. तिला स्वत: च्या सुरक्षिततेसाठी जागेवरून न हालण्याच्या सुचना देण्यात आल्या. त्यानंतर साराने हालचाल न करता सापांच्या सुरक्षतेबद्दलची माहिती दिली. (हेही वाचा - Coronavirus Outbreak: कोरोना व्हायरस बाधित चीनमधील हे वृद्ध जोडपे अनेकांना करतंय भावूक; पहा व्हिडिओ व्हायरल)

साराने रिपोर्टिंगनंतर एका मुलाखती यासंदर्भात चर्चा केली. यावेळी सारा म्हणाली की, मला सापाची खूप भिती वाटते. परंतु, तरीदेखील मला तो शॉट द्यायचा होता आणि मला त्यात यश मिळालं. हा शॉट दिल्यानंतर मी लगेचचं सर्पमित्राला माझ्यापासून सापाला हटवण्याचं सांगितलं.