IPL Auction 2025 Live

Snake Catcher Nirzara Chitti: साडी परिधान केलेल्या महिला सर्पमित्र निर्जारा चित्ती ने हाताने पकडला कोब्रा; व्हिडिओ पाहून नेटिझन्सकडून कौतुकाचा वर्षाव

त्याला कोणत्याही परिस्थितीत घटनास्थळी जाव लागत. साप पकडण्यासाठी तसेच स्वत: च्या सुरक्षिततेसाठी सर्पमित्राला काही वस्तूंची आवश्यकता असते. सध्या सोशल मीडियावर एका सर्पमित्र महिलेचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. ही महिला एका लग्नासाठी साडी परिधान करून तयार झाली होती. मात्र, अचानक साप पकडण्यासाठी तिला बोलावण्यात आलं. त्यामुळे तिला आहे त्या कपड्यांमध्ये घटनास्थळी जावं लागलं. यावेळी तिने साप पकडण्यासाठी लागणारी कोणतीही वस्तू घेतलेली नव्हती. अखेर तिने हाताने साप पकडला.

Snake rescue in saree (Photo Credits: Video grab)

Snake Catcher Nirzara Chitti: सर्प मित्रावर साप पडकडण्याची वेळ सांगून किंवा ठरवून येत नाही. त्याला कोणत्याही परिस्थितीत घटनास्थळी जाव लागत. साप पकडण्यासाठी तसेच स्वत: च्या सुरक्षिततेसाठी सर्पमित्राला काही वस्तूंची आवश्यकता असते. सध्या सोशल मीडियावर एका सर्पमित्र महिलेचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. ही महिला एका लग्नासाठी साडी परिधान करून तयार झाली होती. मात्र, अचानक साप पकडण्यासाठी तिला बोलावण्यात आलं. त्यामुळे तिला आहे त्या कपड्यांमध्ये घटनास्थळी जावं लागलं.

यावेळी तिने साप पकडण्यासाठी लागणारी कोणतीही वस्तू घेतलेली नव्हती. अखेर तिने हाताने साप पकडला. निर्जारा चित्ती (Nirzara Chitti) असं नाव या सर्वमित्र महिलेचं नाव आहे. पारंपरिक वेशातील सर्प बचावाचा व्हिडिओ पाहून अनेक नेटीझन्सनी तिचं कौतुक केलं आहे. या व्हिडिओमध्ये निर्जाराने साडी सावरत साप पकडण्याचं काम केलं आहे. यासंदर्भात बोलताना निर्जारा म्हणते की, साडीमध्ये साप पकडणं थोड अवघड जात आहे. परंतु, तरीदेखील मी प्रयत्न करत आहे. (हेही वाचा -Sudha Murthy Selling Vegetables: अहंकाराला दूर ठेवण्यासाठी सुधा मूर्ती वर्षातून एकदा विकतात भाजीपाला; फोटो पाहून युजर्संनी केलं कौतुक)

निर्जारा चित्ती आणि त्यांचे पती आनंद कर्नाटकच्या बेळगावमधील वन्यजीव तज्ञ आहेत. या जोडप्याचे स्वतःचे YouTube चॅनेल आहे. त्याच्या यूट्यूब चॅनेलवर ते साप पकडतानाचे व्हिडिओ शेअर करत असतात. सध्या सोशल मीडियावर निर्जारचं कौतुक होत आहे. आतापर्यंत अनेकांनी हा व्हिडिओ पाहून रिट्विट केला आहे. तसेच काहींनी या व्हिडिओवर प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत.