Shocking! अन्नपदार्थ सर्व्ह करण्याआधी त्यावर आपले Private Parts घासले, जेवणामध्ये केली लघवी; रेस्टॉरंटमधील वेटरचे घृणास्पद कृत्य
Restaurant (Photo Credit : Pixabay)

Restaurant Worker Rubbed His Genitals On Food: अतिशय गलीच्छ प्रकारे अन्नपदार्थ बनवले जात असल्याचे अनेक व्हिडिओज तुम्ही यापूर्वी पहिले असतील. मुख्यत्वे रस्त्यावरील पदार्थ कोणत्याही प्रकारची स्वच्छतेची काळजी न घेता बनवले जातात. याचाच अर्थ रेस्टॉरंटमधील पदार्थ खाण्यास लायक आहेत असे अजिबात नाही. अमेरिकेतील (US) कॅन्सस (Kansas) राज्यातील लीवूड येथील एका स्टीकहाऊसमधून अशीच एक विचित्र बातमी समोर येत आहे. या ठिकाणी काम करणारा वेटर लोकांना अन्नपदार्थ सर्व्ह करण्याआधी त्या पदार्थांवर आपले प्रायव्हेट पार्ट घासत असे. ते पायाने तुडवत असे, इतकेच नाही तर त्याने अन्नपदार्थांवर लघवीदेखील केली आहे.

जेस क्रिस्टियन हॅन्सन असे या वेटरचे नाव असून तो 21 वर्षांचा आहे. त्याने आपले प्रायव्हेट पार्ट सॅल्मन फिशवर घासले, लोणच्यामध्ये लघवी केली. अहवालानुसार, सॅल्मन सर्व्ह करण्याआधी आपले जननेंद्रिय त्यावर घासले. लोणचे आणि सॉसमध्ये लघवी केली आणि आपल्या प्रायव्हेट पार्टसवर घासलेला लेट्यूस ग्राहकांना खायला दिला.

महत्वाचे म्हणजे जेसने आपल्या घृणास्पद कृत्यांचे व्हिडिओ देखील ऑनलाइन पोस्ट केले होते. त्याने 20 पेक्षा जास्त वेळा असे कृत्य केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. जेस हा कॅन्सस सिटी मेट्रोपॉलिटन एरियामध्ये असलेल्या अपस्केल अशा लीवूड येथील प्रसिद्ध हेरफोर्ड हाउस स्टीकहाउसमध्ये काम करत होता. त्याने पोलिसांना सांगितले की, त्याला डेटिंग ॲप्स आणि फेटिश वेबसाइट्सवर भेटलेल्या लोकांनी असे करण्यास प्रोत्साहन दिले व या गोष्टी करण्यास सांगितले. (हेही वाचा: Cheese Chocolate Gola Recipe: चीज चॉकलेट गोळा तुम्ही कधी खाल्ली आहे का? भन्नाट रेसीपीचा व्हिडिओ व्हायरल)

जेसचे व्हिडिओ समोर आल्यानंतर एफबीआय एजंटांनी पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी रेस्टॉरंटमध्ये याबाबत चौकशी व तपासणी केली असता तिथे जेसचा भंडाफोड झाला. त्यानंतर पोलिसांनी जेसला अटक केली. आता पोलीस साधारण 26 मार्च ते 23 एप्रिल दरम्यान रेस्टॉरंटमध्ये जेसकडून सर्व्ह केलेले जेवण खाल्ल्यानंतर आजारी पडलेल्या व्यक्तींचा शोध घेत आहेत. नमूद केलेल्या कालावधीत किमान 140 लोकांनी रेस्टॉरंटमध्ये जेसद्वारे सर्व्ह केलेले जेवण घेतले होते.