Shocking! शस्त्रक्रियेनंतर बिघडला लोकप्रिय अभिनेत्रीचा चेहरा; ओळखणे झाले कठीण (See Photos)
अभिनेत्रीचे म्हणणे आहे की, बंगळुरूमध्ये तिच्यावर चुकीच्या पद्धतीने उपचार करण्यात आले. तिला उपचाराबाबत अपूर्ण माहिती आणि चुकीची औषधे देण्यात आली, त्यामुळे तिचा चेहरा खराब झाला. अहवालानुसार, शस्त्रक्रियेदरम्यान, तिला भूल देण्याऐवजी सॅलिसिलिक अॅसिड देण्यात आले होते.
चित्रपट आणि टीव्ही क्षेत्रातील लोकांमध्ये चेहऱ्यावरील शस्त्रक्रिया (Facial Plastic Surgery) ही गोष्ट सामान्य आहे. मात्र प्रत्येक वेळी त्याला अपेक्षित यश मिळत नाही आणि नंतर त्याचा फटका सहन करावा लागतो. असाच काहीसा प्रकार स्वाती सतीशच्या (Swathi Sathish) बाबतीत घडला. कन्नड अभिनेत्री स्वाती सतीशचा चेहराही चुकीच्या शस्त्रक्रियेमुळे पूर्णपणे खराब झाला असून, आता तिला ओळखणेही कठीण होत आहे. रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्रीवर रूट कॅनल सर्जरी (Root Canal Surgery) झाली होती. मात्र चुकीच्या उपचारांमुळे तिचा चेहरा खराब बिघडला आहे.
अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये तिच्या चेहऱ्याची सध्याची स्थिती दिसून येत आहे. तिचा चेहरा पूर्णपणे सुजला आहे. उजव्या बाजूला, गालापासून ओठांपर्यंत खूप सूज आहे. अहवालानुसार, अभिनेत्रीने बंगळुरूमध्ये रूट कॅनल शस्त्रक्रिया केली होती, त्यानंतर तिच्या चेहऱ्यावर सूज आली. सुजलेल्या चेहऱ्यावर खूप वेदना होत असल्याचे सांगण्यात येत आहे. अशा बिघडलेल्या चेहऱ्याने तिला घराबाहेर पडणेही कठीण झाले आहे.
अभिनेत्रीचे म्हणणे आहे की, बंगळुरूमध्ये तिच्यावर चुकीच्या पद्धतीने उपचार करण्यात आले. तिला उपचाराबाबत अपूर्ण माहिती आणि चुकीची औषधे देण्यात आली, त्यामुळे तिचा चेहरा खराब झाला. अहवालानुसार, शस्त्रक्रियेदरम्यान, तिला भूल देण्याऐवजी सॅलिसिलिक अॅसिड देण्यात आले होते. जेव्हा स्वाती उपचारासाठी दुसर्या रुग्णालयात पोहोचली तेव्हा ही गोष्ट समोर आली. सध्या तिच्यावर दुसऱ्या रुग्णालयात उपचार सुरू असून तिच्या चेहऱ्यात सुधारणा होत असल्याचे समजत आहे. सॅलिसिलिक ऍसिडचा चुकीचा वापर केल्यास रुग्णाच्या मूत्रपिंड, यकृत आणि हृदयावर वाईट परिणाम होऊ शकतो. (हेही वाचा: तालिबानच्या राजवटीमध्ये लोकप्रिय टीव्ही अँकरवर आली स्ट्रीट फूड विकण्याची वेळ (See Photos)
दरम्यान, चुकीच्या पद्धतीने केलेल्या कॉस्मेटिक प्रक्रियेचे परिणाम गंभीर असू शकतात आणि त्याचा फटका आयुष्यभर बसू शकतो. शस्त्रक्रियेदरम्यान चेहरा खराब होण्याची ही पहिली बातमी नाही. याआधीही अनेक सेलेब्स अशा प्रकारच्या शस्त्रक्रियेचे बळी ठरले आहेत. गेल्या महिन्यात कन्नडची सुप्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री चेतना राज हिचाही प्लास्टिक सर्जरीच्या अपयशामुळे मृत्यू झाला होता. चेतना फक्त 21 वर्षांची होती, तिची बंगलोरमधील एका खाजगी रुग्णालयात फॅट-फ्री कॉस्मेटिक शस्त्रक्रिया झाली, जी तिच्यासाठी प्राणघातक ठरली.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)