धक्कादायक ! केनियाच्या मुलींबरोबर सेनेटरी उत्पादनांच्या बदल्यात ठेवले जातात जबरदस्तीचे लैंगिक संबंध
केनियामधील मुलींना मासिक पाळीच्या काळातील दारिद्र्य ,लज्जा, कलंक आणि सार्वजनिक आरोग्याबद्दल चुकीची माहिती यामुळे सॅनिटरी उत्पादनांच्या बदल्यात लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडले जाते.अशी धक्कादायक माहिती समोर येत आहे.
केनियामधील मुलींना मासिक पाळीच्या काळातील दारिद्र्य ,लज्जा, कलंक आणि सार्वजनिक आरोग्याबद्दल चुकीची माहिती यामुळे सॅनिटरी उत्पादनांच्या बदल्यात लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडले जाते.अशी धक्कादायक माहिती समोर येत आहे.युनिसेफने संशोधनावर हाईलाइट केले असता त्यांना असे आढळले की दहा टक्के किशोरवयीन मुलींनी पश्चिम केनियामध्ये पॅडसाठी ट्रान्झॅक्शनल सेक्स केल्याची कबुली दिली आहे.या संशोधनात असे आढळले आहे की केनियाच्या 54% टक्के मुलींनी मासिक पाळीच्या स्वच्छता व्यवस्थापन उत्पादनांमध्ये प्रवेश करणे आव्हानात्मक असल्याचे सांगितले आणि शाळेत जाणाऱ्या वयाच्या मुलींमध्ये 22% टक्के मुलींनी स्वत: चे स्वच्छता विषयक उत्पादने खरेदी केल्याचे सांगितले. (Thailand King’s Mistress' Naked Photos Leaked: थायलंडच्या राजाच्या गर्लफ्रेंड चे शेकडो नग्न फोटो लीक झाले; राणी आणि गर्लफ्रेंड चे सुरु होतो भांडण )
एंड्रयू ट्रेवेट (Andrew Trevett )केनियाचे युनिसेफ पाणी आणि स्वच्छता प्रमुख यांनी स्वतंत्रपणे बोलताना सांगितले की, मानवतावादी संघटनेने असे आढळून आले आहे की सेनेटरी वस्तूंच्या बदल्यात मुलींवर लैंगिक अत्याचार करणे काही असामान्य गोष्ट नाही.''आमच्याकडे मोटरसायकल टॅक्सी आहेत, ज्यांना बोडा बोडा म्हणतात आणि सेनेटरी पॅडची देवाणघेवाण करणार्या ड्रायव्हर्ससह मूली लैंगिक संबंध ठेवताना दिसतात याची २ कारणे आहेत एक म्हणजे गरीबी आणि दूसरे असे की मूली - महिलांकडे सेनेटरी उत्पादनांची खरेदी करण्यासाठी दूसरे काही साधन नाही आहे.
इथे अजुन एक मुद्दा आहे तो म्हणजे पुरवठ्याचा प्रश्न . सॅनिटरी वस्तूंचा व्यवहारच्या मध्ये लैंगिक संबंध येतात कारण मुलींच्या खेड्यात त्या वस्तू उपलब्ध नाहीत. ग्रामीण भागात मुलींना वाहतुकीचा त्रास होतो आणि त्यांना बसचा प्रवास परवडत नाही. काही दुर्गम खेड्यांमध्ये रस्ते नाहीत आणि बस सेवा ही नाही.ते असे ही म्हणाले की, केनियामध्ये मुली आणि महिलांना मासिक काळातील माहिती उपलब्ध नसलेल्या त्यांच्याकडे या गोष्टींचे पुरेस ज्ञान नाही. मासिक पाळीविषयी संवेदनशीलता म्हणजे मुली आणि मुलांबद्दल कोणतीही माहिती मिळत नाही. घरातील आईकडून तशी माहिती मिळेल असे वाटू शकते पण तसेही काही होत नाही आणि त्याशिवाय शाळेकडून ही काहीच माहिती नाही, असे ही ते म्हणाले. मासिक पाळीच्या सभोवतालची विनाश संपूर्ण आफ्रिकेमध्ये व्यापक आहे.
सरकार, युनिसेफ आणि भागीदारांच्या पुढाकाराने आता 335 शाळांमधील अंदाजे 90,000 मुलींना मासिक पाळी (एमएचएम) सुविधा असलेल्या सुरक्षित आणि स्वच्छतागृहांपर्य़ंत पोहतलेली आहेत.