Shivraj Singh Chauhan: मुसळधार पावसाचा केंद्रीय मंत्र्यांनादेखील फटका; झारखंडच्या दौऱ्यावर शिवराज सिंह चौहान यांची गाडी खड्ड्यात अडकली (Watch Video)

त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. शेवटी त्यांच्या सुरक्षा रक्षकांनी मदतीसाठी यावे लागले.

Photo Credit- X

Shivraj Singh Chauhan: मोदी सरकारमधील मंत्री असलेले केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chouhan) हे झारखंडच्या दौऱ्यावर आहेत. सोमवारी ते एका जाहीर सभेला संबोधित करणार होते. मात्र, त्याआधी बहरगोरा येथील पावसात त्यांची कार खड्ड्यात अडकली. चालकाने गाडी खड्ड्यातून बाहेर काढण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र गाडी न निघाल्याने शिवराज सिंह चौहान यांना गाडीतून खाली उतरावे लागले.

झारखंडमध्ये सध्या निवडणूकांचे वातावरण आहे. अशा स्थितीत भाजपने शिवराज सिंह चौहान यांना झारखंडचे निवडणूक प्रभारी बनवले आहे. त्यासाठी ते झारखंडमध्ये ठिकठिकाणी सभा घेत आहेत. आज ते बहरगोरा येथील जनतेला संबोधित करणार होते. दरम्यान त्यांची कार खड्डयात अडकली. ते खाली उतरल्यानंतर गाडी खड्ड्यातून बाहेर काढण्यात आली.

झारखंडच्या दौऱ्यावर शिवराज सिंह चौहान यांची गाडी खड्ड्यात अडकली

गाडी खडड्यातून बाहेर निघताच केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान हे जाहीर सभेच्या ठिकाणी पोहोचले. तेथे जनतेला संबोधित केले. दरम्यान, सामान्य व्यक्ती दररोज ज्या गोष्टींचा सामना करतो किंवा गुडघाभर पाण्यातून वाट किती कष्ट घेतो अशा गोष्टीचा आज केंद्रीय मंत्र्यांना अनुभव आला असणार.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif