समुद्रामध्ये प्लॅस्टिकच्या पॅकेटमध्ये अडकून तडफडणार्‍या माशाला एका स्कुबा डायवरने दिले जीवनदान; पहा हा हृद्यस्पर्शी व्हिडीओ (Watch Viral Video)

जो सध्या पुन्हा झपाट्याने वायरल होत आहे.

Viral Fish Video| (Photo Credits: Twitter/ Susanta Nanda IFS)

जगभरात वाढतं प्रदूषण आता चिंतेचा विषय बनत चालला आहे. या आव्हानासमोर केवळ मनुष्याचं आयुष्यच नव्हे तर इतरही प्राणीजीवांचं आयुष्य संकटात येत आहेत. अनेक दुर्मिळ जाती-प्रजाती या प्रदुषणामुळे लुप्त होत आहेत. प्लास्टिक हे या प्रदुषणामधील एक महत्त्वाचा घटक आहे. आपल्यासाठी प्लॅस्टिकचा वापर हा तात्पुरता सोयीचा वाटत असला तरीही त्याचे दूर गंभीर परिणाम आहेत. प्लॅस्टिकमुळे अनेक प्राण्यांचे जीव जात असल्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत. सध्या सोशल मीडीयामध्येही अशाच एक व्हीडीओ वायरल होत आहे ज्यात एक मासा पाण्यात प्लॅस्टिकच्या पॅकेटमध्ये अडकल्याने तडफडत आहे. पण त्याच नशीब चांगलं की नेमक्या त्याचवेळी एक स्कुबा ड्रायव्हर तेथे आला आणि त्याने या माशाला जीवनदान दिलं. दरम्यान याचा व्हिडिओ भारतीय वन सेवा अधिकारी सुशांत नंदा यांनी शेअर केला आहे.

दक्षिण थायलंडच्या फुकेत मधील नट सेनमुआंग नावाच्या एका स्कुबा इंस्ट्रक्टरने आपल्या मित्रांसोबत डायविंग करणार्‍या व्यक्तीवर गेली. तेव्हा ती व्यक्ती प्लॅस्टिक पॅकेजमध्ये अडकल्याने तडफडणार्‍या माश्याकडे गेली. तो मासा देखील जीवंत राहण्यासाठी संघर्ष करत होता. स्कुबा ड्रायवरने प्लॅस्टिक बॅग उचलली आणि त्यामधून माशाला बाहेर काढत जीवनदान दिलं.(Human Baby Size Frog Viral Video: Solomon Islands मध्ये गावकर्‍यांना आढळला मनुष्याच्या बाळाच्या आकाराइतका मोठा बेडूक Watch Video).

इथे पहा व्हिडिओ

डेली मेल मध्ये प्रकाशित रिपोर्टमध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार, हा व्हिडिओ 2019 चा आहे. जो सध्या पुन्हा झपाट्याने वायरल होत आहे. Wherever there is a human being, there is an opportunity for kindness या कॅप्शन सह सुशांत नंदा यांनी हा व्हीडीओ शेअर केला आहे. त्याला 38.7k पेक्षा अधिक व्ह्युज मिळाले आहेत. तर लाईक्स, कमेंट्स आणि शेअर चा देखील सध्या पाऊस पडत आहे.