प्राणीसंग्रहालयात वाघाचा लहान मुलावर झडप घालण्याचा प्रयत्न; पाहा 'कसे' वाचले चिमुरड्याचे प्राण
परंतु, नशीब बलवत्तर म्हणून या चिमुरड्याचे प्राण वाचले आहेत. हा मुलगा प्राणीसंग्रहालयात फिरण्यासाठी आला होता. यावेळी त्याने वाघाच्या पिंजऱ्याबाहेर आपला फोटो काढण्यासाठी पोज देण्यास सुरुवात केली.
आयर्लंडमधील (Ireland) डब्लिन (Dublin) शहरातील प्राणीसंग्रहालयात (Zoo Park) एका 7 वर्षाच्या मुलावर वाघाने झडप घालण्याचा प्रयत्न केला. परंतु, नशीब बलवत्तर म्हणून या चिमुरड्याचे प्राण वाचले आहेत. हा मुलगा प्राणीसंग्रहालयात फिरण्यासाठी आला होता. यावेळी त्याने वाघाच्या पिंजऱ्याबाहेर आपला फोटो काढण्यासाठी पोज देण्यास सुरुवात केली.
या मुलाच्या अगदी मागे 1 वाघ उभा होता. हा वाघ सतत त्या मुलाकडे पाहून घुरघुरत होता. अशातच वाघाने अचानक मुलाला काही कळण्याअगोदर मुलावर झडप घातली. परंतु, वाघ आणि मुलगा यांच्यामध्ये एक मजबूत काच होती. त्यामुळे या मुलाचे प्राण वाचले आणि त्याला कोणतीही दुखापत झाली नाही. या सर्व प्रकारामुळे मुलगा घाबरला. तसेच प्राणीसंग्रहालयात या हल्ल्यामुळे खळबळ उडाली. (हेही वाचा - Christmas 2019: Jingle Bells गाण्याचे पुणेरी व्हर्जन; नऊवारीतील चिमुकलीचा व्हिडिओ सोशल मिडियावर होतोय व्हायरल; Watch Video)
सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. अनेकांनी हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. काहींनी मुलाचे प्राण थोडक्यात वाचल्यामुळे देवाचे धन्यवाद मानले आहेत.