Rooster's Love Viral Video: प्रियकर कोंबड्याने केला चोराचा पाटलाग, प्रेयसी कोंबडीची झाली सुटका; पाहा व्हिडिओ
मजेची बाब अशी की, हे प्रियकर प्रेयसी कोणी व्यक्ती नव्हेत तर चक्क कोंबडा आणि कोंबडी (Rooster's Love Viral Video) आहेत. होय, कोंबडा आणि कोंबडी यांच्यातील प्रेमात अडसर ठरणाऱ्या एका चोरट्याचा पाटलाग कोंबडा कसा करतो आणि आपली प्रेयसी सोडवून आणतो असा हा व्हिडिओ आहे.
सोशल मीडिया (Social Media) आणि व्हायरल व्हिडिओ (Viral Video) हे समिकरण खूप जुने झाले. सोशल मीडियावर दररोजच काही ना काही व्हायरल होत असते. आताही असाच एक व्हिडिओ व्हायरल (Rooster Punishes Man Viral Video) झाला आहे. जो नेटीझन्सच्या चर्चेचा विषय ठरला आहे. हा व्हिडिओ एका प्रियकर प्रेयसी आणि चोरटा यांच्यातील आहे. मजेची बाब अशी की, हे प्रियकर प्रेयसी कोणी व्यक्ती नव्हेत तर चक्क कोंबडा आणि कोंबडी (Rooster's Love Viral Video) आहेत. होय, कोंबडा आणि कोंबडी यांच्यातील प्रेमात अडसर ठरणाऱ्या एका चोरट्याचा पाटलाग कोंबडा कसा करतो आणि आपली प्रेयसी सोडवून आणतो असा हा व्हिडिओ आहे.
व्हिडिओत पाहायला मिळते की, एक कोंबडा आणि आजूबाजूला अनेक कोंबड्या चारा खात असतात. दाणे टिपत असतात. अशा वेळी एक व्यक्ती हळूच चोरपावलांनी तिथे येते. त्यातील एक कोंबडी उचलतो आणि निघू लागतो. पण, चाणाक्ष कोंबड्याच्या नजरेतून ही बाब अजिबात सुटत नाही. तो कोंबडी पकडलेल्या व्यक्तीच्या मागे तो असा काही धावतो. जशी काही त्याची प्रेयसीच कोणीतरी पळवली आहे. पण, काही का असेना या व्हिडिओतच दिसते की, कोंबड्याचा पाटलाग वाया जात नाही. तो व्यक्ती कोंबडी तिथेच सोडून पळून जातो. (हेही वाचा, Mother Hen Fight With Snake Viral Video: कोंबडीने ठेचला नागाचा फणा, पिल्लांना वाचविण्यासाठी आईचा रुद्रावतार, पाहा व्हिडिओ)
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ नेटीझन्सना भलताच आवडला आहे. 26 डिसेंबर 2022 रोजी ट्विटरवर या ट्विटर हँडलवरुन शेअर करण्यात आलेला व्हिडिओ हे वृत्त लिहीपर्यंत 71.6 हजार लोकांनी पाहिला आहे. 278 लोकांनी रिट्विट केला आहे. तर 2,283 युजर्सनी लाईक केला आहे. आपणही हा व्हिडिओ पाहू शकता. त्यासाठी वर दिलेल्या व्हिडिओवर क्लिक करा.
व्हिडिओ
एका युजरने प्रतिक्रिया देतना म्हटले की, थांबा! कोंबडा पहिल्यांदा जिममधून जाऊन आला असावा! हा कोंबडा म्हणजे गुडबॉय आहे. दुसरा युदर म्हणतो की, स्वतःचा नाश करण्याच्या प्रक्रियेत असलेल्या शत्रूमध्ये कधीही हस्तक्षेप करू नये. तिसरा युजर म्हणतो की, कोंबड्याचे पाटलाग करणे खरोखरच मनोरंजक आहे. भीतीमुळे स्त्रिया तर नेहमीच ओरडतात.