कोंबड्याची बांग ठरली राष्ट्रीय चर्चेचा मुद्दा, फ्रान्सच्या न्यायालयात कायद्याची लढाई; लोकांनी जोडला स्वाभिमानाशी संबंध

कारण, कोंबडा हा फ्रान्सच्या राष्ट्रीय प्रतिकांपैकी एक आहे. त्यामुळे काही लोक कोंबडा आणि कोंबड्याची मालकीन कॉरिन फेसेउ (Corinne Fesseau) हिच्या बाजूने उभे आहेत. तर, काही लोक 'त्या' दाम्पत्याच्या बाजूने

Cock | (Photo Credits: pixabay)

बातमी तशी साधी. म्हटलं तर गंमतीची. म्हटलं तर गंभीर. तीही एका कोंबड्याची. त्याने दिलेल्या बांगेची. तर मंडळी बातमी आहे. फ्रांस (France) देशातील अत्यंत सुंदर असे ठिकाण ओलरिन द्वीप (orlin island) सध्या जोरदार चर्चेत आहे. चर्चेचा विषय आहे ओलरिन बेटावरील एक कोंबाडा (Cock). होय, बेटावर राहणाऱ्या एका महिलेने एक कोंबडा पाळला आहे. मॉरिस (Maurice) असे या कोंबड्याचे नाव आहे. हा कोंबडा बांग देतो. या कोंबड्याच्या बांगेवरुनच प्रकरण न्यायालयात गेले आहे.

प्रकरण असे की, या कोंबड्याच्या बांगेवर एका जोडप्याचा आक्षेप आहे. हा कोंबडा भल्या सकाळी बांग देतो त्यामुळे झोपमोड होते असे या झोडप्यचे म्हणणे. त्यामुळे या जोडप्याने न्यायालयाचा दरवाचा ठोठवला आहे. जोडप्याच्या आक्षेपावर कोंबड्याच्या मालकीन कॉरिन फेसेउ (Corinne Fesseau) हिचे म्हणने असे की, हे जोडपे सैंड-पियरे डी-ऑलेरॉन (Saint-Pierre-d'Oléron) गावात राहते. जेथे अशा गोष्टी होणे एक सर्वसामान्य गोष्ट आहे.

दोन कुटुंबात कोंबडाकलहावरुन सुरु झालेली न्यायालयीन लढाई (Court Fight) आता राष्ट्रीय स्वाभिमानाशी जोडली जात आहे. कारण, कोंबडा हा फ्रान्सच्या राष्ट्रीय प्रतिकांपैकी एक आहे. त्यामुळे काही लोक कोंबडा आणि कोंबड्याची मालकीन कॉरिन फेसेउ (Corinne Fesseau) हिच्या बाजूने उभे आहेत. तर, काही लोक 'त्या' दाम्पत्याच्या बाजूने. दरम्यान, कॉरिन फेसेउ हिचे म्हणने असे की, ती आपला कोंबडा शेडमध्ये ठेवते आणि लाईट बंद करते. जेनेकरुन अंधार असल्यामुळे कोंबड्याला बांग देता येऊ नये. सोशल मीडियावर हा प्रकार येताच लोक दोन गटांत विभागले आहेत. ते सोशल मीडियावर एकमेकांविरोधत प्रतिक्राय देताना दिसत आहेत. (हेही वाचा, पाहा व्हिडिओ- डोक नसलेला कोंबडा घेतोय समुद्राचा आनंद)

दरम्यान, कोंबडा हा केवळ फ्रान्सच नव्हे तर, भारतातही अनेकदा कायदेशीर लढाईचा विषय ठरला आहे. मागे एकदा पुण्यातील एका दाम्पत्याने शेजाऱ्याचा कोंबडा बांग देऊन झोपमोड करतो म्हणून न्यायालयाचा दरवाचा ठोठावला होता. तर, चंडीगढमध्येही एका निवृत्त मेजरने कोंबडा या विषयावरुनच न्यायालयात शेजाऱ्याविरोधात खटला दाखल केला होता.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif