Romantic Hug in Rain Video Viral: भरपावसात बेडकाची जोडीदाराला रोमँटीक मिठी, व्हिडिओ व्हायरल
जोडपं (Romantic Couple) आणि पाऊस (Rain) म्हटलं की मिठी ओघानेच आली. मग ते जोडपं माणसाचं असूदे नाहीतर प्राण्याचे. सोशल मीडियावर अशाच एका जोडप्याचा व्हिडिओ व्हायरल (Viral Video) झाला आहे. पावसाच्या मदमस्त अंदाजात हे जोडप्याची रोमँटीक मिठी (Romantic Hug) सोशल मीडियावर (Social Media) अनेकांच्या कौतुकाचा विषय ठरली आहे.
जोडपं (Romantic Couple) आणि पाऊस (Rain) म्हटलं की मिठी ओघानेच आली. मग ते जोडपं माणसाचं असूदे नाहीतर प्राण्याचे. सोशल मीडियावर अशाच एका जोडप्याचा व्हिडिओ व्हायरल (Viral Video) झाला आहे. पावसाच्या मदमस्त अंदाजात हे जोडप्याची रोमँटीक मिठी (Romantic Hug) सोशल मीडियावर (Social Media) अनेकांच्या कौतुकाचा विषय ठरली आहे. अर्थात ही, मिठी कोणा माणसातील प्रियकर प्रेयसीची नव्हे बरं..! ती आहे चक्क बेडकांची. होय, हे दोन बेडूक (Frog Hug) भर पावसात एकमेकांना असी मिठी मारत आहेत की, अनेक सिंगल लोक उगाचच कासाविस व्हावेत.
पावसात एकमेकांना मिठी मारत असलेल्या या दोन बेडकांचा एक अतिशय मोहक व्हिडिओ इंटरनेटवर चांगलाच व्हायरल झाला आहे. आम्हाला खात्री आहे अलिकडील काळात पाहिलेली ही सर्वात सर्वात लाखवी वन्यजीव क्लिप असावी. जी आम्ही काहीशी उशिराच पाहिली. पण पाहिल्याबरोबर आम्ही ती आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत. अवघ्या 10-सेकंदाची क्लिप गॅब्रिएल कॉर्नो यांनी ट्विटरवर पोस्ट केली होती. जिला हे वृत्त लिहीपर्यंत 190,000 व्ह्यूज मिळाले आहेत. मोहक क्लिप क्लिप इतकी गोड आहे की तुम्ही ती पुन्हा पुन्हा पहाल असे आम्हााल नक्की वाटते.
व्हायरल व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, पावसात दोन बेडूक एकमेकांना मिठी मारताना दिसत आहेत. हा व्हिडिओ शेअर करताना "टूगेदर इन द रेन" असे या व्हिडिओ कॅप्शन गॅब्रिएल कॉर्नोने यांनी शेअर करताना दिले आहे. (हेही वाचा, Viral Video: डर के आगे जीत है म्हणतं बेडकाने मारली स्नेक राईड, पहा व्हिडीओ)
व्हिडिओ
Together in the Rain pic.twitter.com/x93EgUjQtg
— Gabriele Corno (@Gabriele_Corno) January 11, 2023
व्हिडिओ पाहिल्यानंतर इंटरनेटवर अनेकांनी आनंद व्यक्त केला आहे. हा व्हिडिओ 190,000 पेक्षा जास्त वेळा पाहिला गेला आहे. व्हिडिओने आतापर्यंत 15,000 लाइक्स जमवले आहेत. व्हिडिओ पाहून नेटिझन्सने कमेंट विभागात मनापासून प्रतिक्रिया दिलेल्या दिसतात. एका युजरने म्हटले "एकमेकांची काळजी घेणे यालाच म्हणतात." दुसरा युजर म्हणतो, "Awww छत्री म्हणून फुल वापरणे ही कल्पना खूपच सुंदर आहे''. तिसर्या युजर्सने लिहिले, मी हा व्हिडिओ संपूर्ण दिवस पाहू शकतो, कारण हा खूपच सुंदर आहे.
(The above story first appeared on LatestLY on Jan 14, 2023 03:49 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

