RCB vs MI, IPL 2019: लसिथ मलिंगा याच्या No Ball वरुन अम्पायर ट्रोल; सोशल मीडियात मीम्स व्हायरल!
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि मुंबई इंडियन्स या आयपीएल सामन्यातील शेवटच्या बॉलवरुन झालेल्या वादानंतर सोशल मीडियात मीम्स व्हायरल....
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (Royal Challengers Bangalore) आणि मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) मध्ये रंगलेल्या आयपीएल (IPL 2019) सामन्यात बंगलोरचा 6 धावांनी पराभव झाला. सामन्यातील शेवटचा बॉल 'नो बॉल' असूनही पंचांच्या अयोग्य निर्णयामुळे बंगलोरच्या हातातून सामना निसटला. त्यानंतर बंगलोर संघाचा कर्णधार विराट कोहली चांगलाच भडकला. इतकंच नाही तर त्याने पंचांना खडे बोल देखील सुनावले. पंचांनी अधिक सतर्कतेने आणि काळजीपूर्वक काम करायला हवे, असेही तो म्हणाला. विराट भडकल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि त्यानंतर सोशल मीडियावर हे प्रकरण चांगलेच गाजत आहे. सामन्यातील शेवटच्या बॉलवरुन वाद; RCB कर्णधार विराट कोहली भडकला (Viral Video)
सामन्यातील शेवटची ओव्हर मुंबई इंडियन्सचा लसिथ मलिंगा (Lasith Malinga) टाकत होता. मात्र मलिंगा बॉलिंग करत असताना अम्पायर झोपले होते का? अशाप्रकारे अनेक फनी मीम्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
तुम्हीही पहा हे फनी मीम्स...
अम्पायरच्या एका निर्णयामुळे सामन्याचा निकाल बदलू शकला असता. त्यामुळे अम्पायर सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल होत आहेत.