Rats Damaged Ganja: उंदरांना लागलं अमली पदार्थांचे व्यसन! आधी लाखोंची दारू प्यायली, नंतर गटकला करोडोंचा गांजा
वास्तविक, तस्करीतून जप्त केलेला गांजा पोलिस ठाण्यात उंदरांनी खाल्ला. जप्त केलेल्या गांजाची किंमत 5.20 कोटी रुपये आहे. गोदामात ठेवलेली गांजाच्या पाकिटांचे वजन केले असता ही बाब उघडकीस आली.
Rats Damaged Ganja: उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) एटा जिल्ह्यात (Etah District) उंदरांची (Rats) दहशत पाहायला मिळाली आहे. येथील उंदिरांना चक्क अंमली पदार्थांची चटक लागली. पोलिस ठाण्याच्या गोदामात ठेवलेला करोडो रुपयांचा गांजा उंदरांनी फस्त केला. वास्तविक, तस्करीतून जप्त केलेला गांजा (Ganja) पोलिस ठाण्यात उंदरांनी खाल्ला. जप्त केलेल्या गांजाची किंमत 5.20 कोटी रुपये आहे. गोदामात ठेवलेली गांजाच्या पाकिटांचे वजन केले असता ही बाब उघडकीस आली. उंदरांनी गांजाची पाकिटे फाडून फस्त केली असं पोलिसांनी सांगितलं आहे.
अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्सच्या ऑपरेशनल युनिट आग्रा येथे तैनात सीओ इरफान नासीर खान यांनी 6 फेब्रुवारी 2024 रोजी मालवण पोलिस स्टेशन क्षेत्रातील असपूर टोल प्लाझा येथून दोन लोकांना कँटरसह पकडले होते. या कँटरमध्ये जुन्या साड्यांच्या गाठींमध्ये लपवून गांजाची वाहतूक केली जात होती. जप्त केलेला गांजा 10.41 क्विंटल असून, त्याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत किंमत 5.20 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. (हेही वाचा - Patient Died After Rat Bite In Sassoon Hospital: ICU मध्ये उंदीर चावला त्यामुळे रुग्ण दगावला? पुणे येथील ससून रुग्णालयातील धक्कादायक घटना)
अटक आरोपींनी सांगितले की, ते सिंडिकेटचे काम करतात. हे लोक ओडिशातून हा गांजा आणत होते. अलिगड आणि आसपासच्या जिल्ह्यांमध्ये त्याचा पुरवठा केला जाणार होता. पकडल्यानंतर अंमली पदार्थ विरोधी पथकाने मालवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून गांजा गोदामात जमा केला. (हेही वाचा - Dead Rat Found In Hershey's Chocolate Syrup: झेप्टोवरून ऑर्डर केलेल्या चॉकलेट सिरपमध्ये सापडला मृत उंदीर; पहा व्हायरल व्हिडिओ)
दरम्यान, गेल्या महिन्यात तत्कालीन अतिरिक्त पोलिस अधीक्षक धनंजयसिंह कुशवाह यांनी मालखाना येथे पाहणी केली. येथे त्यांना गोदामात गांजाची कापलेली पाकिटे सापडली. त्यानंतर त्यांची बदली करण्यात आली. याआधीही एसएसपी बदलण्यात आले होते. अशा स्थितीत हे प्रकरण प्रलंबित राहिले. मात्र, सध्याचे पोलीस स्टेशन प्रभारी नित्यानंद पांडे यांनी सांगितले की, साहेब तपासणीसाठी आले होते, काही पाकिटे कापली होती, जी उंदरांनी चावली आहेत. याआधी 2021 मध्येही कोतवाली देहाटमध्ये असाच एक प्रकार समोर आला होता. येथील दारूचा 1400 मुद्देमाल गहाळ झाला होता. त्यावेळी पोलिसांनी तपास अहवालात दारूच्या पेट्या उंदीरांनी चावल्याचे म्हटले होते. त्यामुळे दारूचा साठा नष्ट झाल्याचं त्यांनी नमूद केलं होतं.