'परवानगीशिवाय जन्म दिल्याने आई वडिलांना कोर्टात खेचणार Raphael Samuel,राफेलच्या आईने फेसबूक पोस्टद्वारा शेअर केली या प्रकरणातील तिची बाजू
'आई-वडिलांनी आपल्या परवानगीशिवाय आपल्याला जन्म दिल्याने मी त्यांना कोर्टात खेचत आहे' या वक्तव्यावरून राफेल सेम्युअल चर्चेमध्ये आला आहे.
Raphael Samuel हे नाव मागील एक-दोन दिवसांपासून खूपच खर्चेमध्ये आलं आहे. 'आई-वडिलांनी आपल्या परवानगीशिवाय आपल्याला जन्म दिल्याने मी त्यांना कोर्टात खेचत आहे' अशी पोस्ट त्याने फेसबुकवर टाकली आणि इंटरनेटवर अनेक उलट सुलट चर्चांचं, प्रश्नांचं वादळ सुरू झालं आहे. काही प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी राफेलने स्वतः युट्युबवर एक खास व्हिडिओ प्रकाशित केला आहे तर आज त्याच्या आईचं या प्रकरणावर काय मत आहे ते फेसबूक पोस्टमधून लिहलं आहे.
Raphael Samuel कोण?
Raphael Samuel हा 27 वर्षीय आणि स्वातंत्र्य विचारसरणीचा एक मुलगा आहे. अँटी नेटलिज्म (anti-natalist)या विचारसरणीचा तो पुरस्कर्ता आहे. या विचारसराणीची लोकं
'हे जग समस्यांनी भरलेले आहे. त्यामुळे लोकांनी मुलांना जन्म देऊ नये यासाठी त्यांचे मन वळवणे' या उद्दिष्टासाठी काम करत असतात. राफेलादेखील तसेच वाटते. आई- वडीलांवर मी देखील खूप प्रेम करतो पण याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही आई-वडीलांचं देणं लागता.
राफेलच्या आईचं मत काय?
राफेलच्या आई वडीलांनी त्याचा हा निर्णय स्वीकारला आहे. राफेलच्या मते वडिलांपेक्षा आईने हा निर्णय अधिक मोकळेपणाने स्वीकारला आहे. सॅम्युअल स्वतंत्र विचारसरणीचा मुलगा असल्याचा त्याच्या आईला अभिमान आणि आनंद आहे. आपल्या मुलाच्या उतावळेपणाची प्रशंसा केली आहे. सॅम्युअलला जन्म देण्यापूर्वी मी त्याची परवानगी कशी काय घेऊ शकते हे जर तो कोर्टात सिद्ध करू शकला, तर मी माझी चूक मान्य करेन असे राफेलने फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.
राफेलचे आई-वडील पेशाने वकील आहे. या प्रकरणामध्ये आता पुढे काय होणार? आपला समाज खरच हा प्रगल्भ विचारसरणीने या सार्यांचा विचार करणार का? तुम्हांला राफेलचं मतं पटतयं का? हे आम्हांला नक्की सांगा.