रानू मंडल यांची 10 वर्षांनी पोटच्या मुलीशी भेट, मायलेकींचा हसरा फोटो सोशल मीडियात व्हायरल (See Photo)

सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओमुळे आपल्या आईला शोधणे शक्य झाले असे रानू यांच्या मुलीने सांगितले आहे.

Ranu Mondal Meets Daughter After 10 Years (Photo Credits: Facebook)

सोशल मीडियाची ताकद दाखवून देणारे अनेक प्रसंग अगदी रोज घडतात, त्यातील अलीकडंचच एक खास उदाहरण म्हणजे रानू मंडल (Ranu Mondal). एकीकडे अन्नान्नदशा, फाटके कपडे, अशा अवस्थेत पश्चिम बंगाल मधील एका रेल्वे स्टेशनवर रानू यांचा सुरेल आवाजात गाणं गातानाचा एक व्हिडीओ काही दिवसांपूर्वी सर्वत्र तुफान व्हायरल झाला होता. यानंतर रानू रातोरात जणू सोशल मीडिया सेन्सेशन बनल्या, रिऍलिटी शोज, सिनेमा, गाण्याचे अल्बम, अशा अनेक ऑफर राणू यांच्यापाशी येऊ लागल्या. या सर्व सुखद धक्क्यांनंतर आता रानू यांना नशिबाने आणखी एक सुख प्राप्त झाले आहे. या व्हायरल व्हिडीओमुळे रानू यांची मुलगी साती रॉय (Saati Roy)  ही तब्बल दहा वर्षाने आपल्या आईपाशी परतली आहे. या मायलेकींचा एक फोटो सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

खरंतर या फोटो मध्ये राणूंच्या चेहऱ्यावर अमाप आनंद पाहायला मिळत आहे. मात्र यानंतर नेटकऱ्यांनी राणूंच्या मुलीला टार्गेट करायला सुरुवात केली आहे. वाईट अवस्थेत आईला एकटीला सोडलेल्या मुलीला आता 10 वर्षांनी अचानक आईची आठवण कशी आली अशा शब्दात तिच्यावर टीका होत आहे. यावर उत्तर देत रेणू यांचा व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या अरविंद चक्रवर्ती ने उत्तर देत आपल्यामुळे या मायलेकींनी भेट झाल्याचे समाधान व्यक्त केले आहे. तर सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओमुळे आपल्या आईला शोधणे शक्य झाले असे रानू यांच्या मुलीने सांगितले आहे.(सारा अली खान च्या Viral Video मुळे घरातून पळून गेलेल्या मुलाची कुटुंबाशी भेट (Watch Video)

रानू मंडल आणि साती रॉय

दरम्यान पतीच्या निधनानंतर रानू स्टेशनवर गाणी गात आपला निर्वाह करत होत्या मात्र आता आयुष्याच्या या वळणावर तिचे जीवन पूर्णतः बदलून गेले आहे.रानू या हिमेश रेशमियाच्या ‘हॅपी हार्डी और हिर’ या बॉलिवूड चित्रपटाच्या माध्यमातून पार्श्वगायनाची सुरवात करणार आहेत. या चित्रपटात त्या ‘तेरी मेरी कहानी’ हे गाणं गाताना दिसणार आहेत.