राजस्थान येथे 13 फूट लांब अजगराने कुत्र्याला गिळले, पहा व्हिडिओ

व्हायरल झालेला हा व्हिडिओ उदयपूर मधील असून 13 फूट लांब अजगराने कुत्र्याला गिळल्याचा प्रकार समोर आला आहे.

अजगराने कुत्र्याला गिळले (फोटो सौजन्य-फेसबुक)

राजस्थान (Rajashthan) येथे सर्वांच्या भुवया उंचावल्या जातील असा एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. व्हायरल झालेला हा व्हिडिओ उदयपूर मधील असून 13 फूट लांब अजगराने कुत्र्याला गिळल्याचा प्रकार समोर आला आहे. येथील एका स्थानिक व्यक्तीने या सर्व प्रकाराचा व्हिडिओ त्याच्या मोबाईलवर शूट केला आहे. बुधवारी पशु बचाव अभियानात हा व्यक्ती गेला असता तेथे काही लोक 13 फूट लांब अजगाराला त्रास देत असल्याचे दिसून आले. या अजगाराने काहीतरी गिळले असल्याने त्याच्या येथे सर्वजण जमा झाले होते.

व्हिडिओ शूट केलेल्या व्यक्तीने असे सांगितले आहे की, अजगराच्या जवळ गेलो असता त्याने एका कुत्र्याला गिळत असल्याचे पाहिले. अजगराची एखादी गोष्ट गिळण्याची शक्ती जेवढी मजबूत असते त्याच शक्तीचा वापर करत तो कुत्र्याला कसाबसा तोंडातून गिळण्याचा प्रयत्न करत होता. अशा प्रकारची शिकार केल्यानंतर ते खाण्यासाठी अजगारा फार उर्जा लागते.(मुंबई: शॉपिंग मॉलच्या बाहेर उंदरांना पकडण्यासाठी ठेवले ग्लू पॅड, अडकला गेला विषारी साप)

यापूर्वीसुद्धा अजगराने कुत्रे आणि बकरी गिळल्याचा प्रकार समोर आला आहे. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात हरियाणा मधील पलवल येथे सुद्धा अजगराने कुत्र्याला अख्ख्ये गिळले होते.