Rail Accident: वेगवान एक्सप्रेस ट्रेन खाली बाईकचा क्षणात चक्काचूर झाला; दैव बलवत्तर म्हणून चालक बचावला; पहा काळजाचा ठोका चुकवणारा हा अपघाताचा व्हिडिओ

ही घटना नेमक्या कुठल्या शहरातील आहे हे समजू शकलेले नाही. पण रेल्वे क्रॉसिंगजवळ फाटक नसल्याने नागरिकांचा जीव किती धोक्यात येऊ शकतो याची पुन्हा एकदा अनेकांना प्रचिती आली आहे.

Bike Accident| Photo Credits: Screenshot From Video @rajtoday

काळ आला होता पण वेळ आली नव्हती या उक्तीचा जिवंत अनुभव एका बाईकस्वार तरूणाने नुकताच घेतला आहे. सोशल मीडियामध्ये @rajtoday या ट्वीटर अकाऊंट वरून शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही काळजाचा ठोका चुकवणार्‍या या अपघाताची दाहकता पाहू शकता. दरम्यान वेगवान एक्सप्रेस ट्रेन जवळ बाईक असल्याने ट्रेनच्या वेगात क्षणात त्याचा चक्काचूर झाल्याचं या व्हिडिओ मध्ये स्पष्ट दिसत आहे. ही घटना नेमक्या कुठल्या शहरातील आहे हे समजू शकलेले नाही. पण रेल्वे क्रॉसिंगजवळ फाटक नसल्याने नागरिकांचा जीव किती धोक्यात येऊ शकतो याची पुन्हा एकदा अनेकांना प्रचिती आली आहे.

रेल्वे अपघाताचा हा व्हिडिओ 24 जानेवारी 2021 चा आहे. यामध्ये रेल्वे ट्रॅक जवळ फाटक नसल्याने एक बाईकस्वार अगदी ट्रॅक जवळ आला. दरम्यान नेमका तिकडचा रस्ता खडबडीत असल्याने त्याच्या बाईकचा तोल गेला आणि तो एका बाजूला पडला. सुदैवाने तो बाईक खाली अडकला नाही किंवा ट्रॅक वर पडला नाही. तो गाडीच्या मागच्या बाजूला पडल्याने काही वेळातच उठू शकला. पण त्याला बाईक सावरायला वेळ मिळाला नाही. समोरून वेगात असलेली लांब पल्ल्याची एक्सप्रेस ट्रेन आली आणि त्याखाली बाईक सापडल्याने त्याचे क्षणात तुकडे तुकडे झाले. बाईकस्वार तरूण त्याकडे बघतच राहिला. सध्या या अपघातचं सीसीटीव्ही फूटेज सोशल मीडीयात वायरल होत आहे. मुंबई: रेल्वे रूळांवर अवतरला होता 'जीव वाचवणारा' यमदूत! रेल्वे सुरक्षेबाबत जनजागृतीसाठी अनोखा उपक्रम.

अपघाताचा व्हिडीओ

ट्वीट केलेल्या व्हिडीओ खाली नेटकर्‍यांनी तरूण सुरक्षित असल्याबद्दल दिलासा व्यक्त केला आहे. तर काहींनी राजधानी एक्सप्रेस कडून बाईकस्वाराला नुकसानभरापाई मिळावी अशी अपेक्षा देखील व्यक्त करण्यात आली आहे.दरम्यान यामध्ये नेमकी चूक कोणाची हा सवाल वादादीत आहे. पण रेल्वे फाटक आणि अपघात हा अत्यंत गंभीर प्रश्न आहे.त्याच्यामुळे अनेकांना जीव गमवावे लागले आहेत. रेल्वे प्रशासन लवकारच यावर ठोस पावलं उचलेल अशी अपेक्षा आहे. रेल्वे कडून सुरक्षा अभियान राबवली जातात. तसेच ट्रॅक क्रॉस करणं हा दंडनीय गुन्हा आहे.