Baby Pygmy Hippo Thailand: बेबी पिग्मी हिप्पो मू डेंग सोशल मीडियावर व्हायरल, थाई प्राणीसंग्रहालयात गर्दी
सोशल मीडियावर तिचे असंख्य चाहते असून, ती पर्यटकांना खाओ खियो ओपन प्राणीसंग्रहालयाकडे आकर्षित करत आहे.
दोन महिन्यांच्या पिग्मी हिप्पो (Baby Pygmy Hippo) मू डेंगने (Moo Deng) आपल्या मोहक हालचालींनी जगभरातील कोट्यवधी लोकांच्या मनावर गारुड केले आहे. सोशल मीडियावर हा हिप्पो विशेष चर्चेत आहे. ज्यामुळे बँकॉकच्या पूर्वेस असलेल्या खाओ खेओ ओपन प्राणीसंग्रहालयात (Khao Kheow Open Zoo Zoo) त्याला पाहण्यासाठी लोक मोठ्या संख्येने लोक आकर्षित झाले आहेत. गुलाबी गाल आणि चंचलता यामुळे हा हिप्पो विशेष आकर्षण मिळवत आहे. प्राणीसंग्रहालयाला भेट देणाऱ्या अनेक चाहत्यांनी त्याच्या हालचाली कॅमेऱ्यात कैद केल्या असून, त्याचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. ज्यामध्ये हा हिप्पो विविध फळे खाणे, हालचाली करणे, पाण्यात डुंबणे यांसारख्या कृतींचा सामवेश आहे.
सोशल मीडियावर हिप्पोचे नामकरण
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओममध्ये मू डेंग तिच्या रक्षकांच्या लक्ष वेधून घेताना आनंदात दिसत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ Facebook वर 5.8 दशलक्ष पेक्षा अधिक लोकांनी पाहिला आहे. चाहत्यांनी त्याचे 'हिप्पो म्हणून पुनर्जन्म घेतलेला सुपरस्टार' आणि 'नैसर्गिकरित्या जन्मलेला सेलिब्रिटी' असा उल्लेख केला आहे. प्राणीसंग्रहालयाचे संचालक नारोंगविट चोडचोय सीएनएनशी बोलताना म्हणाले की, मू डेंगच्या लोकप्रियतेमुळे प्राणीसंग्रहालयास भेट देणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत 30% वाढ झाली आहे. हिप्पोची नैसर्गिक सौंदर्य आणि वर्तन पर्यटकांना आकर्षित करते, असे नारोंगविट यांनी सांगितले.
मू डेंगची प्रसिद्धी हेच खरे आव्हान
दरम्यान, या नवजात हिप्पोस प्रसिद्धी मिळत असली तरी, ही प्रसिद्धीच मोठे आव्हान असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे. मू डेंगच्या प्रसिद्धीमुळे झालेल्या गर्दीमुळे पर्यटक मोठ्या प्रमाणावर आकर्षित झाले. हे पर्यटक त्याच्यासोबत गैरवर्तन करताना दिसत आहेत. काही पर्यटकांनी अयोग्य वर्तन करत तिच्यावर पाणी ओतले आणि वस्तूही फेकल्या. ज्यामुळे हिप्पोच्या वर्तनात बदल झाला. त्यामुळे ही प्रसिद्धीच खरे आव्हान ठरते की, काय अशी स्थिती आहे. त्यामुळे चिंता व्यक्त होत आहे.
इथे आहे हिप्पोची छबी
मु डेंग म्हणजे काय?
नव्या हिप्पोस दिलेले मु डेंग हे नाव थाई भाषेतील शब्दावरुन आले आहे. ज्याचा थाई भाषेत 'बॉन्सी पिग' असा अर्थ होतो. ऑगस्टच्या एका सर्वेक्षणात 20,000 Facebook वापरकर्त्यांनी या नावाला आलईक केले. तिचा जन्म 10 जुलै रोजी पालक जोना आणि टोनी यांच्यामध्ये झाला नंतर ती तिच्या भावंडांसह मू टून आणि मू वॉर्नमध्ये सामील झाली.
पश्चिम आफ्रिकेतील पिग्मी हिप्पो ही लुप्त होण्याच्या मार्गावर असलेली प्रजाती आहे. या प्रजातीचे केवळ 2,000 वन्य प्राणी आहेत. ते प्रामुख्याने लाइबेरिया, सिएरा लिओन, गिनी आणि आयव्हरी कोस्टमध्ये आढळतात. प्राणीसंग्रहालयात मू डेंग यांची उपस्थिती ही केवळ मनोरंजनाची संधीच नाही तर या दुर्मिळ प्राण्यांचे संरक्षण करण्यासाठी संवर्धन प्रयत्नांची गरज देखील आहे, असे अभ्यासक सांगतात.