Watch Video: फिलिपिन्समध्ये जन्मले दोन जीभ आणि एक डोळा असणारे कुत्र्याचे पिल्लू; जन्मानंतर काही तासातचं झाला मृत्यू

या नवजात पिल्लाला फक्त एक डोळा आणि दोन जीभ आहेत. नवजात पिल्लाचा डोळा त्याच्या मध्यभागी स्थित आहे. आश्चर्यकारक गोष्ट अशी आहे की, या पिल्लाला नाक नाही.

Puppy with two tongues (Photo Credits: Twitter/NewsBop)

Watch Video: फिलिपिन्स (Philippines) च्या अकलान (Aklan) प्रांतातून एक विचित्र बातमी समोर आली आहे. खरंच, अकलान प्रांतात राहणाऱ्या एमी डी मार्टिन (Amie de Martin) यांच्या पाळीव कुत्र्याने दोन पिल्लांना (Puppy) जन्म दिला. हे पाहून एमी आश्चर्यचकित झाली. यातील एक पप्पी सामान्य होता. परंतु दुसऱ्या पिल्लाचा आकार वेगळा दिसत होता. मार्टिनच्या म्हणण्यानुसार, दुसऱ्या पिल्लाला दोन जीभ असून एकच डोळा आहे.

सोशल मीडियावर या पिल्लाचा फोटो खूपचं व्हायरल होत आहे. या नवजात पिल्लाला फक्त एक डोळा आणि दोन जीभ आहेत. नवजात पिल्लाचा डोळा त्याच्या मध्यभागी स्थित आहे. आश्चर्यकारक गोष्ट अशी आहे की, या पिल्लाला नाक नाही. नाक नसल्यामुळे, त्याला श्वासोच्छवासाच्याही अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. (वाचा - Fish Eating Another Larger Fish-Fact Check: माशाने गिळला मासा, पाहा कसा? जबरदस्त व्हिडिओ, जाणून घ्या वास्तव)

या नवजात पिल्लाला वाचवण्यासाठी एमी डी मार्टिनने सर्वतोपरी प्रयत्न केले. ती या पिल्लावर उपचार करण्यासाठी पशुवैद्यकांकडे गेली. परंतु, या पिल्लाचा जीव वाचविण्यात एमी अयशस्वी झाली. दुसर्‍या दिवशी रात्री दहाच्या सुमारास या नवजात पिल्लाने अखेरचा श्वास घेतला. मार्टिनच्या म्हणण्यानुसार, नवजात पिल्लू योग्य प्रकारे श्वास घेण्यास सक्षम नव्हते. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif