धक्कादायक! हिंदू मंदिरामधील 'पवित्र पाण्याने' नवऱ्याने धुतला बायकोचा प्रायव्हेट पार्ट; पोलिसांच्या कारवाईच्या भीतीने मागितली माफी (Video)

इंडोनेशिया (Indonesia) येथील बाली (Bali) बेटावर एका हिंदू मंदिरामध्ये एका पुरुषाने मंदिरातील पवित्र पाण्याने (Holy Water) महिलेचा प्रायव्हेट पार्ट धुतल्याची धक्कादायक घटना घडली होती.

'पवित्र पाण्याने' धुतला स्त्रीचा प्रायव्हेट पार्ट (Photo Credit : Instagram)

कोणत्याही धर्मासाठी त्या धर्माच्या कल्पना, धर्माचा काही ठराविक गोष्टींवर असणारा विश्वास फार महत्वाचा असतो. मात्र कधी कधी अनवधानाने किंवा ठरवून असे एखादे कृत्य घडते ज्यामुळे त्या धर्माच्या लोकांचा भावना दुखावल्या जाऊ शकतात. इंडोनेशिया (Indonesia) येथील बाली (Bali) बेटावर एका हिंदू मंदिरामध्ये एका पुरुषाने मंदिरातील पवित्र पाण्याने (Holy Water) महिलेचा प्रायव्हेट पार्ट धुतल्याची धक्कादायक घटना घडली होती. क्षणार्धात या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. मात्र आता या जोडप्याने याबद्दल सर्वांची माफी मागितली आहे.

हे जोडपे झेक रिपब्लिक (Czech Republic) येथील असून, त्यांनी इंस्टाग्रामवर हा व्हिडीओ पोस्ट केला होता. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की एक स्त्री आपला स्कर्ट वर करते आणि पुरुष तिच्या प्रायव्हेट पार्टसवर पवित्र पाणी शिंपडतो. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर हिंदुबहुल इंडोनेशियन बेटावरील स्थानिकांकडून या घटनेबाबत जोरदार टीका होऊ लागली. या घटनेबाबत बालीनिज डिझायनर नीलूह डेलॅंटिक यांनी लिहिले होती की, ‘जर आपण आपले रक्षण करू शकत नसू आणि या बेटावर येणाऱ्या पर्यटकांवर निवडीवर नियंत्रण ठेऊ शकत नसू तर बालीचा विनाश पक्का आहे’.

या घटनेबाबत वाढता संताप आणि पोलिसांच्या संभाव्य कारवाईला सामोरे जाण्याच्या भीतीने या दाम्पत्याने माफीचा व्हिडिओ जारी केला. त्यांनी व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, ‘आम्ही पवित्र पाण्याचा अपमान केला आहे त्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत,. त्या पाण्याबद्दल आम्हास माहित नव्हते त्यामुळे या प्रकरणाबद्दल आम्ही माफी मागतो.’