फेक वेबसाईट कडून 2 लाखापर्यंत ‘Pradhan Mantri Yojana Loan’अंतर्गत कर्ज मिळत असल्याचा दावा; जाणून घ्या या वायरल न्यूज मागील सत्य

दरम्यान केंद्र सरकारने जनतेला अफवांवर विश्वास ठेवू नका. सरकारी वेबसाईट वर विश्वास ठेवा.

Fake News on Pradhan Mantri Yojana Loan (Photo Credits: PIB)

सोशल मीडीयामध्ये सध्या 'प्रधानमंत्री योजना लोन' अंतर्गत 1-2 लाखापर्यंत कर्ज मिळू शकते अशा आशयाचा एक मेसेज सध्या झपट्याने वायरल होत आहे. बनावट वेबसाईट pradhanmantriyojanaloan.com वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या माहितीमध्ये ज्यांच्याकडे बिझनेस सुरू करण्यासाठी पुरेसे पैसे नाहीत त्यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या या नव्या योजनेअंतर्गत कर्ज मिळू शकते. पण पीआयबी फॅक्ट चेक ने ट्वीटरच्या माध्यमातून हा दावा खोटा असल्याचं सांगितलं आहे.

दरम्यान पीआयबी वर दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकार कडून अशाप्रकारे कोणतीही वेबसाईट चालवली जात नाही. ही वेबसाईट फेक असल्याचं पीआयबी कडून सांगण्यात आले आहे. या बनावट वेबसाईटच्या माध्यमातून काही खाजगी माहिती घेण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी सावध राहण्यातच शहाणपण आहे. दरम्यान बनावट वेबसाईट पाहिल्यास तुम्हांला अनेक लहान मोठ्या 'स्पेलिंग एरर' पाहता येतील.  Staff Selection Commission चं अधिकृत ट्वीटर अकाऊंट @SSCorg_in? PIB Fact Check ने फेक ट्वीटर अकाऊंट बद्दल केला खुलासा.

PIB Fact Check

सध्या सोशल मीडियामध्ये व्हॉट्स अ‍ॅप, फेसबूक, ट्वीटरच्या माध्यमातून खोट्या बातम्या पसरवल्या जातात. दरम्यान केंद्र सरकारने जनतेला अफवांवर विश्वास ठेवू नका. सरकारी वेबसाईट वर विश्वास ठेवा.तुमची खाजगी कोणासोबतही शेअर करू नका.मागील लॉकडाउनच्या काळात आणि कोरोना संकटामुळे निर्माण झालेल्या स्थितीचा गैरफायदा घेत अनेक समाजकंटकांकडून आर्थिक फसवणूक करत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif