पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटर, फेसबुक प्रोफाईलवर दाखवली 'गमछा' स्टाईल; बदलले सोशल मीडियाचे DP (See Photos)
नरेंद्र मोदीं नी आपल्या भाषणाच्यानंतर काहीच वेळात आपले प्रोफाइल अपडेट केले असून आता फेसबुक, इंस्टाग्राम , ट्विटर सहित सर्व प्रोफाईलवर मोदींचा हा गमछाने कव्हर केलेल्या चेहऱ्याचा फोटो दिसत लावल्याचे दिसत आहे.
कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) संकटापासन वाचण्यासाठी आपल्याला सतत N95 इतके महागडे मास्क वापरण्याची गरज नाही, जर का तुम्ही अगदी अत्यावश्यक खरेदीसाठी बाहेर पडत असाल तर तुम्ही घरगुती रुमालाने बनवलेले मास्क वापरून सुद्धा स्वतःचे रक्षण करू शकता हाच सल्ला देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज आपल्या भाषणाच्या सुरुवातीला एक बेसिक गमछा (Gamcha) घालून सुरुवात केली होती. आता हीच गमछा स्टाईल करण्यासाठी लोकांना सुद्धा प्रोत्साहन मिळावे म्हणून त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंट प्रोफाइल फोटो सुद्धा बदलले आहेत. मोदींनी आपल्या भाषणाच्यानंतर काहीच वेळात आपले प्रोफाइल अपडेट केले असून आता फेसबुक, इंस्टाग्राम , ट्विटर सहित सर्व प्रोफाईलवर मोदींचा हा गमछाने कव्हर केलेल्या चेहऱ्याचा फोटो दिसत लावल्याचे दिसत आहे. Lockdown Extended: लॉकडाउन काळात कोरोनाशी लढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला 7 नियमांचा हा मास्टरप्लॅन; जाणून घ्या सविस्तर
नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीला गमछा ने आपला चेहरा कव्हर केला होता. यासाठी पांढऱ्या रंगाचे कापड आणि त्यावर लाल रंगात डिझाईन अशा सध्या रूपात असणारा हा पारंपरिक बेसिक गमछा मोदींनी निवडला होता. यापूर्वीही सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक असताना सुद्धा त्यांनी असाच मास्क वापरला होता. तसेच अनेकदा त्यांनी कोरोनाशी लढा देण्यासाठी घरगुती मास्क वापरा असे आवाहन केले होते. मोदींनी हे आवाहन करताच देशातील अनेकांनी गमछासोबत फोटो काढून सोशल मीडियावर अपलोड केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषांतील महत्वाचे मुद्दे जाणून घ्या.
नरेंद्र मोदी सोशल मीडिया अकाउंट प्रोफाइल फोटो
दरम्यान, आज मोदींनी आपल्या भाशांतवून देशातील लॉक डाऊन हे 3 मे पर्यंत वाढवणार असल्याची महत्वपूर्ण घोषणा केली आहे. देशात सद्य घडीला कोरोना बाधितांची एकूण संख्या ही 10,363 वर जाऊन पोहोचली आहे. यात 8988 सक्रिय केसेस, 1035 डिस्चार्ज मिळालेले रुग्ण तसेच 339 मृत्यू झालेल्या रुग्णांचा समावेश आहे. ही संपूर्ण परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी सर्व नागरिकांनी लॉक डाउनच्या नियमाचे पालन करावे असे आवाहन पंतप्रधानांनी केले आहे.