पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिवे लावण्याच्या आवाहनावर सोशल मीडियात युजर्सकडून मिम्सचा पाऊस

त्यामुळे सध्या लॉकडाउनचे आदेश देण्यात आले आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येत्या 5 एप्रिलला घरातील लाईट्स बंद करुन रात्री 9 वाजता दिवे लावून कोरोनाच्या अंध:काराल दूर करण्याचे आवाहन केले आहे.

Funny memes on PM Modi video message (Photo Credits: Twitter)

कोरोना व्हायरसने देशभरात थैमान घालत आहे. त्यामुळे सध्या लॉकडाउनचे आदेश देण्यात आले आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येत्या 5 एप्रिलला घरातील लाईट्स बंद करुन रात्री 9 वाजता दिवे लावून कोरोनाच्या अंध:काराल दूर करण्याचे आवाहन केले आहे. यावर आता सोशल मीडियात जोरदार चर्चा सुरु असून त्यासंदर्भातील विविध जोक्स आणि मिम्स व्हायरल होत आहे. तसेच ट्वीटरवर #9Baje9Minute असा हॅशटॅग वापरून मिम्स पोस्ट करत आहेत. या मिम्सवर बऱ्याच युजर्सकडून प्रतिक्रिया दिल्या जात असून आता लोक दिवे लावण्याच्या आवाहनाला तयार असल्याचे म्हणत आहेत. यापूर्वी नरेंद्र मोदी यांनी जनता कर्फ्यूनंतर थाळी वाजवण्याचे आवाहन केले होते. त्यावेळी सुद्धा प्रचंड प्रमाणात मिम्सचा पाऊस सोशल मीडियात पडलेला दिसून आला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांच्या लॉकडाउनचे आदेश दिल्यानंतरच प्रथम देशातील जनतेशी शुक्रवारी पुन्हा बातचीत केली आहे. यापूर्वी मोदी यांनी जनता कर्फ्यू संपल्यावर नागरिकांना थाळी, टाळी वाजवण्याचे आवाहन करत देशातील तमात डॉक्टर्स आणि अत्यावश्यक सेवासुविधांसाठी कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांचे आभार मानण्यास सांगितले होते. या आवाहनावर विविध राज्यातील नागरिकांमध्ये मोठा उत्साह दिसून आला होता. तसेच नागरिकांनी थाळी वाजवण्याचे व्हिडिओ फोटो सुद्धा सोशल मीडियात शेअर केले होचे. मात्र आता नागरिकांना घरातील लाईट्स बंद करुन दिवे लावण्याचे आवाहन मोदी यांनी केले आहे. याच पार्श्वभुमीवर ट्वीटरवर या संदर्भातील मिम्स आणि जोक्स व्हायरल होत आहेत.(Coronavirus in India: 5 एप्रिलला रात्री 9 वाजता 9 मिनिटांसाठी एक दिवा लावा, कोरोनाच्या अंध:काराला दूर करण्यासाठी एकजूट दाखवा: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आवाहन)

Need no Candles

Oh Yes!

Karne Ka!

Practising For The Task

Hahaha!

दरम्यान, दिवे लावण्याच्या आवाहनामुळे नागरिक उत्साही आहेत. पण कोरोनाचा वाढता प्रादु्र्भाव पाहता त्याची सुद्धा काळजी घ्यावी. मात्र देशावरील कोरोनाचे महासंकट समोर असताना नागरिकांच्या चेहऱ्यावरील हास्य पाहण्यासाठी विविध विनोद सोशल मीडियात केले जात आहेत.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif