Piya Tu Ab To Aaja Dance: हेलन च्या गाण्यावर अशा थिरकल्या 'या' दोन आज्या की व्हिडिओ पाहुन नेटकरी करत राहिले वाहवा (Watch Video)

पिया तु अब तो आजा (Piya Tu Ab To Aaja) गाण्यावर दोन आजीबाईंंनी लावलेले ठुमके सोशल मीडीयावर सगळ्यांंचेच लक्ष वेधुन घेत आहेत. अनेकांंनी हा व्हिडीओ शेअर केला आहे,

Piya Tu Ab To Aaja Dance: हेलन च्या गाण्यावर अशा थिरकल्या 'या' दोन आज्या की व्हिडिओ पाहुन नेटकरी करत राहिले वाहवा (Watch Video)
Piya Tu Ab To Aaja Dance Video (Photo Credits: Twitter)

मागील जवळपास पाचहुन अधिक महिने सगळा देश घरात बंंदी झालेला असताना आता सोशल मीडियावर मात्र मोकळेपणाने नाचणार्‍या दोन आजींंचा व्हिडीओ व्हायरल (Viral Video)  होत आहे. याला स्वातंत्र्य म्हणु नये तर आणखीन काय? हो ना? बर्‍याचदा लोक काय म्हणतील या भीतीने कधी कधी तर आपल्यावरीलच अविश्वासाने आपण अनेक साध्या साध्या गोष्टी करण्यापासुन सुद्धा मागेच राहतो, पण या सगळ्या चिंंता सोडुन चक्क रस्त्यावर उतरुन या दोन आजी बाईंंनी नाच केला आहे. ते पण साध्या सुध्या नव्हे तर चक्क हेलनच्या (Helan)  गाण्यावर. पिया तु अब तो आजा (Piya Tu Ab To Aaja)  म्हणत या दोघींंनी लावलेले ठुमके सोशल मीडीयावर सगळ्यांंचेच लक्ष वेधुन घेत आहेत. अनेकांंनी हा व्हिडीओ शेअर केला आहे, यावर शेकडो कमेंट्स आणि हजारो लाईक्स आहेत काय आहे हा नेमका प्रकार चला तर पाहुयात. #JusticeForKaku Video & Memes: 1800 रुपयांंचा हिशोब मागणार्‍या काकु सोशल मीडियावर व्हायरल, पहा हा मजेशीर व्हिडिओ आणि मीम्स

आपण व्हिडिओ मध्ये पाहु शकता की, भर रस्त्यात कदाचित कुण्या रेडिओ किंंवा डीजे वर पिया तु अब तो आजा गाणंं लागलं आणि कसलाही विचार न करता नाचायला सुरुवात केली. यात आधी चार जणी नाचत होत्या मात्र नंंतर 2 जणी बाजुला झाल्या आणि उरलेल्या दोघींंनी मात्र मनमुराद नाचुन घेतलं. हा व्हिडिओ आणि लगतची गर्दी पाहता हा लॉकडाउन च्या आधीचा जुना व्हिडिओ असल्याचे दिसत आहे.

पहा हा आजीबाईंंचा डान्स

दरम्यान यावर अनेकांंनी कमेट्स करत तुम्ही फार गोड आहात, मी ही म्हातरपणी अशीच होईन वैगरे कमेंंट्स केल्या आहेत. आणि खरंंच जर का तुम्ही ही ठरवलंच तर वय, जागा कोणत्याही बंंधनात न अडकता तुम्हीही अशी मजा नक्कीच करु शकाल, हो पण आता लॉकडाउन मध्ये नको.

(The above story first appeared on LatestLY on Aug 31, 2020 04:41 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).