भयंकर! मुलीच्या Lungs मधून काढली 3.5 Cm ची पिन
तर या मुलीवर उपचार करुन ब्राँन्कोस्कोपने ती पिन बाहेर काढण्यात डॉक्टरांना यश आले आहे.
एका 18 वर्षीय मुलीच्या फुफ्फुसात(Lungs) 6 दिवस अडकून पडल्याची धक्कादायक घडना घडली आहे. तर या मुलीवर उपचार करुन ब्राँन्कोस्कोपने ती पिन बाहेर काढण्यात डॉक्टरांना यश आले आहे.
इयाना शेख(नाव बदलले) ही गोव्याला 21 नोव्हेंबर रोजी आली होती. त्यावेळी चेहऱ्याला स्कार्फ बांधण्यासाठी तिने बॅगधील पिन काढून ती तोंडात धरली. परंतु चुकून ती पिन इयानाने गिळली. त्यावेळी तातडीने तिला नजीकच्या डॉक्टरांकडे नेण्यात आले. तेव्हा पिन नक्की कुठे अडकली आहे हे शोधण्यासाठी तिच्या छातीचा एक्सरा(X-Ray) काढण्यात आला. त्यावेळी ती पिन इयानाच्या फुफ्फुसात अडकली असल्याचे दिसून आले. परंतु पिन काढण्यासाठी एण्डोस्कोपी करुनसुद्धा ती पिन बाहेर काढता आली नाही. त्यावेळी गोव्यातील एका डॉक्टरांनी तिची शस्रक्रिया करुन अडकलेली पिन बाहेर काढण्याचा मार्ग सूचवला.
या मुलीला मुंबईत उपचारासाठी झेन रुग्णालयात दाखल करण्यात आले.या रुग्णालयाती फुफ्फुस स्पेशालिस्ट डॉक्टरांनी फुफ्फुसात अडकलेली पिन यशस्वीरित्या बाहेर काढली आहे. तसेच ही पिन धारधार आणि अणकुचीदार असल्याने ती काढली नसती तर इयानाच्या रक्तवाहिन्यांना नुकसान पोहचले असते असे डॉक्टरांनी इयानाच्या घरातील मंडळींना सांगितले आहे.