Staff Selection Commission चं अधिकृत ट्वीटर अकाऊंट @SSCorg_in? PIB Fact Check ने फेक ट्वीटर अकाऊंट बद्दल केला खुलासा

त्यामुळे अधिक अपडेट्स केवळ SSC च्या ऑफिशिएल अकाऊंट्स https://ssc.nic.in वर पाहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Fake News on SSC (Photo Credits: PIB)

सरकारी नोकरीचे अपडेट्स पाहण्यासाठी अनेकांचे स्टाफ सिलेक्शन ऑफ कमिशनच्या वेबसाईटवर लक्ष असते. हेच अपडेट्स तुम्हांला सोशल मीडीयात पाहण्यासाठी ट्वीटर अकाऊंट म्हणून @SSCorg_in ला फॉलो करा अशा प्रकारचे मेसेज पसरवले जात आहेत. पण हे खोटं असल्याचं PIB Fact Check कडून सांगण्यात आले आहे. दरम्यान एसएससी चे कोणतेही अधिकृत ट्वीटर अकाऊंट नाही असे देखील सांगण्यात आले आहे. त्यामुळे अधिक अपडेट्स केवळ SSC च्या ऑफिशिएल अकाऊंट्स https://ssc.nic.in वर पाहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान भारतामध्ये Department of Personnel and Training (DoPT)सोबत एसएसी काम करते. एसएससी द्वारा देशभरात विविध मंत्रालयामध्ये नोकरभरती केली जाते. सध्या या एसएससी बाबत काही संभ्रम पसरवणारे मेसेज वायरल होत आहेत. पण सरकारकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, अधिकृत वेबसाईट द्वाराच देण्यात येणार्‍या माहितीवर नागरिकांनी, इच्छुक उमेदवारांनी विश्वास ठेवाव. इतर माध्यमांबाबतचे पसरवले जाणारे मेसेज खोटे आहेत. Fact Check: AYUSH योजने अंतर्गत सरकार लोकांना देणार मासिक आर्थिक भरपाई? PIB ने केला खुलासा.

PIB Fact Check

भारतामध्ये कोरोना लॉकडाऊनच्या काळात लोकांच्या मनात असलेल्या भीतीचा गैरफायदा घेत अनेक खोट्या बातम्या पसवत असतात. पण सरकार कडून वारंवार हे आवाहन करण्यात आले आहे की नागरिकांनी अनधिकृत सूत्रांकडून कोणत्याही माहितीवर विश्वास ठेवू नये. सरकारी यंत्रणांकडून दिलेल्या माहितीवर विश्वास ठेवा.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif