Intelligence Bureau मध्ये नोकरभरतीसाठी जाहिरात? जाणून घ्या सोशल मीडीयात व्हायरल होत असलेल्या Recruitment Ad वर PIB Fact Check
या जाहिरातीमध्ये केलेल्या दाव्यानुसार, आय बी मध्ये काहींना नोकरीची संधी दिली जाणार आहे. पण ही जाहिरात खोटी असल्याचं आता समोर आलं आहे.
इंटेलिजंस ब्युरो शी निगडीत भरती प्रक्रियेबाबत जाहिरत मागील काही दिवसांपासून शेअर केली आहे. या जाहिरातीमध्ये केलेल्या दाव्यानुसार, आय बी मध्ये काहींना नोकरीची संधी दिली जाणार आहे. पण ही जाहिरात खोटी असल्याचं आता समोर आलं आहे. यामध्ये टेस्ट, इंटरव्ह्यू यांचा समावेश असेल असे सांगत खोटं भासवण्यात आलं आहे. तसेच ही खोटी जाहिरात राज्यानुसार विविध शहरात असल्याचं सांगण्यात आलं आहे. त्यासाठी प्रदेशवार परीक्षा होतील असे देखील सांगितले आहे.
सोशल मीडीयात वायरल केल्या जात असलेल्या नोकरभरतीच्या जाहिरातीमध्ये असा देखील दावा आहे की 18 ते 27 वर्षातील उमेदवार नोकरीसाठी अर्ज दाखल करू शकतात. तर आरक्षित वर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट मिळेल, पण हा दावा खोटा आहे. PIB फॅक्ट चेकच्या अधिकृत ट्वीटर अकाऊंटवरून याची माहिती देताना आयबी मध्ये होणारी नोकरभरती ही युपीएससी, एसएससी कडून देशपातळीवर होणार्या परीक्षांमधूनच केली जाते असे स्पष्ट करण्यात आले आहे.
PIB Fact Check
सध्या रेल्वे मधील नोकरभरतीबाबतही अशाच प्रकारची माहिती दिली जात आहे. त्याच्या वायरल झालेल्या बातमीमध्ये रेल्वे कडून सुमारे 1.5 लाख पदांसाठी 15 डिसेंबर सुरू केलेल्या परीक्षा रद्द झाल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र तसे काहीही नाही. सार्या परीक्षा नेमून दिलेल्या वेळापत्रकानुसार सुरू करण्यात आल्या आहेत. RRBs/RRCs वेबसाईटवरूनच रेल्वे नोकरभरतीच्या जागांबद्दल दिलेल्या माहितीवर विश्वास ठेवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. जर कुणी नोकरीचं आमिष दाखवून फसवणूक करत असेल तर 182 या नंबरवर संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.