महाराष्ट्र पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचा सोशल मीडीयावर व्हायरल होत असलेल्या फोटोमधील तरूणी रिया चक्रवर्ती नव्हे तर दिशा पटानी; जाणून घ्या Viral Photo मागील सत्य !
काही युजर्सने केलेल्या दाव्यानुसार ती तरूणी रिया चक्रवर्ती असल्याच सांगितले जात आहे. मात्र हा दावा खोटा आहे.
महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांचा त्यांच्या कारमध्ये एका तरूणीसोबतचा फोटो मागील काही तासांमध्ये सोशल मीडीयामध्ये झपाट्याने व्हायरल होत आहे. काही युजर्सने केलेल्या दाव्यानुसार ती तरूणी रिया चक्रवर्ती असल्याच सांगितले जात आहे. मात्र हा दावा खोटा आहे. आदित्य ठाकरेंसोबत असणारी मुलगी रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) नसून ती अभिनेत्री दिशा पटानी (Disha Patani) आहे. वर्षभरापूर्वी आदित्य आणि दिशा मुंबईमध्ये एका रेस्ट्रॉरंटमध्ये एकत्र जेवायला गेले होते. तेव्हा टिपलेला आता व्हायरल होत आहे.
दरम्यान रिया चक्रवर्ती ही अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची गर्लफ्रेंड होती. सुशांतच्या आत्महत्येला रिया जबाबदार असल्याचा आरोप सुशांतच्या कुटुंबाने केला आहे. पाटनामध्ये तशी तक्रार दाखल झाल्यानंतर आता मुंबई पोलिस आणि बिहार पोलिस याआत्महत्येचे गुढ उकलण्यामध्ये लागले आहे. काहींनी सुशांत सिंह राजपूत प्रकरणाची सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. Sushant Singh Rajput Case: सुशांतसिंह राजपूतच्या वडिलांनी रिया चक्रवर्ती विरूद्ध दाखल केला FIR; आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप.
सोशल मीडीयावर मात्र काही युजर्सने दिशा पटानी आणि आदित्य ठाकरे यांचा एकत्र गाडीमधील फोटो पोस्ट करून फोटोतील तरूणी रिया चक्रवर्ती असून तिची आणि आदित्य ठाकरेंची मैत्री आहे म्हणून महाराष्ट्र सरकार सुशांतच्या आत्महत्येचे प्रकरण सीबीआय कडे देत नसल्याचं तर्क लावत आहे.
अंकिता दवे (Ankita Dave)या ट्वीटर अकाऊंटवरून शेअर करण्यात आलेल्या फोटोला 5 हजारांपेक्षा अधिक रिट्विट्स, 13 हजारांहून अधिक लाईक्स आणि हजारांपेक्षा अधिक कमेंट्स आहेत.
सोशल मीडीयात व्हायरल होणारा फोटो आणि मेसेज
दरम्यान काही दिवसांपूर्वीच खाजगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये हे स्पष्ट केले आहे की सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येचा तपास करण्यासाठी मुंबई पोलिस सक्षम आहे. यामध्ये राजकारण आणू नये. काल उशिरा मुंबईमध्ये त्यांनी मुंबई पोलिस कमिशनर परमबीर सिंह आणि महासंचालकांसोबत बैठक देखील घेतली आहे.