Viral Video: पाकिस्तानी कंटेंट क्रिएटरवर पाळीव चित्त्याचा हल्ला, नेटीझन्स म्हणाले, 'तुम्ही यास पात्र आहात' (Watch Video)

त्याच्या बाजूला चित्ता बसला होता. नौमनने त्याच्यासमोर मान झुकवताचं चित्त्याने त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर कंटेंट क्रिएटर तेथून उठून जाताना व्हिडिओमध्ये दिसत आहे.

Pet Cheetah Attacks Pakistani Content Creator (PC - Instagram)

Viral Video: एका पाकिस्तानी कंटेंट क्रिएटर (Pakistani Content Creator) वर पाळीव चित्त्याने हल्ला (Pet Cheetah Attacks) करण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) होत आहे. हा व्हिडिओ पाहून यूजर्स कंटेंट क्रिएटरवर टीका करत आहेत. नौमन हसन असं या कंटेंट क्रिएटरचं नाव आहे. नौमन हसन हा वाघ, साप आणि मगरींसह अनेक वन्य प्राण्यांचे पाळीव प्राणी म्हणून व्हिडिओ पोस्ट करतो.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये तो सोफ्यावर एका व्यक्तीसोबत बसलेला दिसत आहे. त्याच्या बाजूला चित्ता बसला होता. नौमनने त्याच्यासमोर मान झुकवताचं चित्त्याने त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर कंटेंट क्रिएटर तेथून उठून जाताना व्हिडिओमध्ये दिसत आहे. इंस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करताना त्याने त्याला 'चीता हल्ला' असे कॅप्शन दिले आहे. नौमनला वन्य प्राण्यांना पाळीव केल्याबद्दल सोशल मीडियावर वारंवार टीकेचा सामना करावा लागतो, अनेक वापरकर्त्यांनी त्याला क्रूर असं म्हटलं आहे. एका वापरकर्त्याने व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की, 'हे या प्राण्यासाठी हे खूप क्रूर आहे. ते त्याच्या नैसर्गिक वातावरणात असावे.' (हेही वाचा - Pet Dog Brutally Beaten in Elevator: सोसायटीच्या लिफ्टमध्ये पाळीव कुत्र्यास बेदम मारहाण, गुरुग्राम येथील घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद (Watch Video))

पहा व्हिडिओ - 

 

View this post on Instagram

 

A post shared by Nouman Hassan (@nouman.hassan1)

इतर अनेकांनी वन्य प्राण्यांनी त्यांच्या नैसर्गिक अधिवासात रहावे अशी भावना व्यक्त केली. 'त्यांना या प्राण्यांना बंद ठेवण्याची परवानगी का आहे? ते हल्ला करण्यास पात्र आहेत,' असं म्हटलं आहे. तसेच दुसऱ्या एका यूजरने म्हटलं आहे की, 'जगातील सर्वात स्वस्त लोक ते आहेत जे वन्यजीवांना घरातील पाळीव प्राणी म्हणून ठेवतात. पैशाने वर्ग किंवा नैतिकता विकत घेता येत नाही.'