लिंबू महाग झाल्याने वाईट नजरेपासून वाचण्यासाठी लोक मिरचीसोबत लटकवत आहेत लसूण; IPS अधिकाऱ्याने दिली मजेदार प्रतिक्रिया, See Viral Photo

ज्यामध्ये मिरचीसोबत लिंबूऐवजी लसूण लटकलेला दिसत आहे. हे चित्र पाहून तुमच्या मनात एक गोष्ट नक्कीच आली असेल की, मिरचीसोबत लिंबू टांगले जाते. मग इथे लसूण का दिसतोय?

Hanging garlic along with chillies (PC - Twitter)

Garlic Viral Photo: वाढत्या महागाईने जनता त्रस्त झाली आहे. महागाईचा चटका सर्वांनाच बसत आहे. दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींनी जनता हैराण झाली होती. मात्र, आता लिंबाच्या गगनाला भिडलेल्या किमतींमुळे या उन्हाळ्यात लोकांचे हाल झाले आहेत. उन्हाळ्यात जिथे लोकांना लिंबाची सर्वाधिक गरज असते, तिथे महागाईमुळे सर्वसामान्यांना लिंबू खरेदी करणे कठीण झाले आहे. लिंबाच्या किमतीवर सोशल मीडियावर अनेक विनोदही केले जात आहेत. लिंबाच्या किमती वाढल्याने लोक मजेदार मीम्स आणि जोक्स शेअर करत आहेत.

त्याचवेळी, आता सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे. ज्यामध्ये मिरचीसोबत लिंबूऐवजी लसूण लटकलेला दिसत आहे. हे चित्र पाहून तुमच्या मनात एक गोष्ट नक्कीच आली असेल की, मिरचीसोबत लिंबू टांगले जाते. मग इथे लसूण का दिसतोय? कारण लिंबू इतकं महाग झालं आहे की, वाईट नजरेपासून दूर राहण्यासाठी एवढं महागड लिंबू विकत घेणे लोकांना शक्य नाही. तुम्हा सर्वांना माहीत असेलचं की, लोक अनेकदा दुकाने आणि वाहनांवर लिंबू आणि मिरची टांगतात, जेणेकरून त्यांच्यावर वाईट नजर लागू नये. (हेही वाचा - Ranbir-Alia Wedding: कोलकात्यात चाहत्यांनी रणबीर-आलियाचे लग्न केले थाटात साजरे; अभिनेत्रीला दिले माँ दुर्गेचे रूप, पहा फोटोज)

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा फोटो आयपीएस अधिकारी रुपिन शर्मा यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. फोटोसोबत त्यांनी एक मजेशीर कॅप्शनही लिहिले आहे. त्यांनी लिहिले आहे की, "वाढती महागाई पाहता लिंबू नसताना लसूणला प्रतिनियुक्तीवर टाकण्यात आले आहे. लसणाने आज पदभार स्वीकारला आहे." शर्मा यांच्या या पोस्टवर लोक मजेशीर कमेंट करत आहेत. एका वापरकर्त्याने लिहिले आहे, 'पुढील आदेशापर्यंत लसणाची प्रतिनियुक्ती सुरू राहील."