पंचकुला पोलिसांचं ज्येष्ठ नागरिकाला सरप्राईज देत लॉकडाऊन मध्येही 'स्पेशल बर्थ डे सेलिब्रेशन'; सोशल मीडियामध्ये व्हायरल होतोय व्हिडिओ
सध्या पंचकुला येथील एका ज्येष्ठ व्यक्तीच्या बर्थडे सेलिब्रेशनमध्ये पोलिस खात्याने दिलेल्या सरप्राईजचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे.
सध्या भारत देश लॉकडाऊनमध्ये असल्याने सेलिब्रेशन, पार्ट्या यासार्याचेच प्लॅन्स पुढे ढकलावे लागले आहेत. कोरोनाच्या संकटात लहान मुलं आणि घरातील वयोवृद्ध मंडळी यांना अधिक धोका असल्याने त्यांना घराबाहेर पडू नका, काळजी घ्या असा सल्ला दिला जात आहे. पण कोरोना व्हायरस लॉकडाऊनमध्येही नागरिकांच्या मदतीला आणि रक्षणाला पोलिस खात्याचे अधिकारी हजर आहेत. सध्या पंचकुला येथील एका ज्येष्ठ व्यक्तीच्या बर्थडे सेलिब्रेशनमध्ये पोलिस खात्याने दिलेल्या सरप्राईजचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे.
सुरूवातीला अचानक गेटवर पोलिस पाहून ही वयोवृद्ध व्यक्ती गोंधळली होती मात्र नंतर हे बर्थ डे सरप्राईज असल्याचं समजल्यानंतर मात्र त्यांच्या आनंदाला पारावर नव्हता. पोलिसांच्या अशा हळव्या सेलिब्रेशनला पाहून त्यांचाही यंदाचा बर्थ डे खास झाला. लॉकडाऊनमध्ये बाहेर भेटण्याचा प्लॅन बनवत होते मित्र; पुणे पोलिसांनीही व्यक्त केली भेटण्याची इच्छा, मजेशीर ट्वीट व्हायरल.
पोलिसांनी वाढदिवस असणार्या आजोबांसाठी ' हॅप्पी म्हटलं' सोबतच व्हिडिओमध्ये ' हम भी आपकी फॅमेली है' असं ऐकायला येत आहे. त्यानंतर त्यांनी खास बर्थडे केक कापला. त्यांना खास बर्थ डे कॅप देखील देण्यात आली होती. हरियाणाचे आयपीएस पंकज जैन यांनी ट्वीटर अकाऊंटवर त्याचा खास व्हिडीओ केला आहे. 'पोलिसांसोबत येणारा संबंध हा भावनिक असतो. कधी भीती कधी राग कधी अस्वस्थता कधी विनम्रता. पण हा क्षण खूपच खास आहे. एकट्या राहणार्या एका अशा ज्येष्ठ नागरिकाचा हा अविस्मरणीय वाढदिवस असेल.
Pankaj Nain IPS ट्वीट
दरम्यान 24 मार्च पासून भारतामध्ये लॉकडाऊन सुरू आहे. दिवसागणिक कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. यामध्ये अफवा, फेक न्यूजमुळे अनेकांच्या मनात धस्स होत आहे. इतक्या तणावाच्या स्थितीमध्ये काहींच्या आयुष्यात आनंदाचे क्षण थोडे विस्मरणीय करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. पंचकुला पोलिसांचेही त्यामध्ये कौतुक आहे. 2020 नवं वर्ष काही महिन्यांपूर्वी सुरू झालं तेव्हा कोणालाच पुढे भविष्यात असं काही उभं ठाकलं असेल याचा विचारही केला नव्हता. सध्या कोव्हिड 19 विरूद्ध लढणार्या योद्धाच्या सार्याच प्रयत्नांचं कौतुक करण्यात आलं आहे.
Mumbai LOCKDOWN : हजारो लोकांच पोट भरणार Community Kitchen ; इथे ना धर्म पहिला जातो ना जात : Watch Video
दरम्यान काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील नागपूरमध्येही अशाच प्रकारे पोलिसांनी एका तरूणाचा बर्थ डे साजरा केला होता. त्याने पोलिस कंट्रोल रूमला फोन करून केक घेण्यासाठी बाहेर पडू का? यासाठी परवानगी मागितली होती, मात्र आता संचारबंदी असल्याने त्याला बाहेर न पडण्याचा सल्ल्ला देत पोलिस स्वतः त्याच्या बिल्डिंगखाली केक घेऊन पोहचले होते.