हातात अजगर, शेजारी मगर घेऊन भडकली पाकिस्तानी गायिका Rabi Pirzada; भारतीय आणि पीएम नरेंद्र मोदींना दिली साप हल्ल्याची धमकी (Video)

विशेषत: पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांना हा संदेश लागू होतो. रबीने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये ती साप, मगर अशा भयानक प्राण्यांशी खेळताना दिसत आहे. हे सर्व प्राणी पंतप्रधान मोदींसाठी खास भेटवस्तू आहेत असे तिचे म्हणणे आहे.

साप हातात घेतलेली रबी पिरजादा (Photo Credit : Twitter)

भारत-पाकिस्तान यांमधील राजनैतिक तणावामध्ये ठिणगी टाकण्यासाठी दोन्हीकडील जनतेचा थोडाफार हात असतो. त्यात पाकिस्तानी लोक तर अनेक छोट्या मोठ्या कृत्यांनी भारतीयांना उकसावण्याचा प्रयत्न करताना दिसून येतात. यामध्ये आता पाकिस्तानी गायिका रबी पिरजादा (Rabi Pirzada) हिचा समावेश झाला आहे. आपल्या ट्विटर पोस्टमध्ये रबीने भारतीयांना एक संदेश दिला आहे. विशेषत: पंतप्रधान नरेंद्र मोदीं (Prime Minister Narendra Modi) यांना हा संदेश लागू होतो. रबीने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये ती साप, मगर अशा भयानक प्राण्यांशी खेळताना दिसत आहे. हे सर्व प्राणी पंतप्रधान मोदींसाठी खास भेटवस्तू आहेत असे तिचे म्हणणे आहे.

काश्मीर मुद्द्यावरून सध्या पाकिस्तान प्रचंड आक्रमक झाला आहे. भारताकडून काश्मीर परत मिळवून घेऊच अशी त्यांची भूमिका आहे. याच बाबतील गायिका रबी पिरजादाने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा मागे घेतल्याबद्दल, पीरजादाने अप्रत्यक्षपणे भारतावर साप हल्ला (Snake Attack) करण्याची धमकी तिच्या व्हिडिओद्वारे दिली आहे. ती स्वतः काश्मिरी असल्याने याबाबत तिच्या भावना उफाळून आल्या आहेत.

रबी पिरजादा ट्विट -

साप हातात घेतलेली रबी या व्हिडीओममध्ये आपल्याला दिसत आहे. तिच्या भोवती अजगर आणि मगर असे प्राणीही आपल्याला दिसतात. रबी हे सर्व प्राणी भारतीयांना विशेषतः पीएम मोदी यांना भेट म्हणून पाठवणार असल्याचे ती म्हणत आहे. या सर्व प्राण्यांपासून मरून तुम्ही सर्व भारतीय नरकात जा असेही ती पुढे म्हणते. नंतर ही पाकिस्तानी गायिका काश्मीरच्या समर्थनार्थ एका गाणेही गाताना दिसते. (हेही वाचा: Ganesh Chaturthi 2019: या मुस्लिम देशा च्या नोटांवर आहे 'गणपति बाप्पा' विराजमान, हे आहे कारण)

सध्या हा व्हिडीओ सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होत असून रबीला लोकांनी ट्रोल करायला सुरुवात केली आहे. काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तान आंतरराष्ट्रीय स्तरावरही अपमानित झाला होता. त्यामुळे निराश पाकिस्तानी नागरिकांचे मानसिक संतुलन हरवले असल्याचे दिसते. अनुच्छेद 370 रद्द करण्याच्या भारताच्या निर्णयामुळे पाकिस्तानी नागरिक सैरभैर झाले आहेत त्यामुळेच अशा प्रकारचे व्हिडीओ समोर येत आहेत.