Viral Video: 'खिडकी उघडा, मला गुटखा थुंकायचा आहे,' प्रवाशाची विचित्र मागणी ऐकून एअर होस्टेसने काय केलं? तुम्हीचं पहा व्हायरल व्हिडिओ

हा मजेदार व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. लोक हा व्हिडिओ आनंदाने पाहत आहेत. प्रवाशाने एअर होस्टेसला अशी काही गोष्ट विचारली की, विमानातील सर्वजण थक्क झाले.

Viral Video: 'खिडकी उघडा, मला गुटखा थुंकायचा आहे,' प्रवाशाची विचित्र मागणी ऐकून एअर होस्टेसने काय केलं? तुम्हीचं पहा व्हायरल व्हिडिओ
Passenger Viral Video (PC - Instagram)

Viral Video: सोशल मीडियावर रोज नव-नवीन व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत असतात. यातील काही व्हिडिओ पोट धरून हसायला लावतात. असाचं एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक प्रवासी विमान एअर होस्टेटची गंमत करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये एक तरुण प्रवासी आपल्या तळहातावर तंबाखू चोळल्यासारखे करताना दिसत आहे. हा प्रवासी त्याच्या जवळ आलेल्या एअर होस्टेसला 'खिडकी उघडा, मला गुटखा थुंकायचा आहे,' असं म्हणताना दिसत आहे. यानंतर सर्व प्रवासी आणि एअर होस्टेस खळखळून हसताना दिसत आहे.

हा मजेदार व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. लोक हा व्हिडिओ आनंदाने पाहत आहेत. प्रवाशाने एअर होस्टेसला अशी काही गोष्ट विचारली की, विमानातील सर्वजण थक्क झाले. मात्र, विमानात अशी अशी कोणतीही वस्तू नेता येत नाही. म्हणजेच हा प्रवाशी एअर होस्टेससोबतच मस्करी करत होता. (हेही वाचा - Viral Video: चंदिगडमध्ये IAS Yashpal Garg यांनी CPR देऊन वाचवले हृदयविकाराच्या रुग्णाचे प्राण; सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होतोय व्हिडिओ, Watch)

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, हा प्रवासी आपल्या तळहातावर गुटखा चोळल्यासारखे कृत्य करून एअर होस्टेसकडून अशी मजेशीर मागणी करतो की, तिला ती ऐकून हसू आवरता येत नाही. प्रवाशाबाबत अशी विचित्र गोष्ट किंवा प्रवाशाचे बिनबुडाचे बोल ऐकून इतर प्रवासीही चक्रावून जातात. या व्हिडिओला आतापर्यंत दहा लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर ‘गोविंदशर्मा’ नावाच्या आयडीवरून शेअर करण्यात आला आहे.

(The above story first appeared on LatestLY on Jan 19, 2023 07:51 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).