Viral Photo: मधुचंद्राच्या रात्री पत्नीला पाहायचे सोडून पती पाहत होता 'ही' गोष्ट, नववधूची Reaction पाहून लोकांनी दिल्या मजेशीर प्रतिक्रिया
या फोटोला नेटक-यांनी मजेशीर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे.
कोरोना व्हायरसमुळे गेल्या वर्षभरापासून अनेक जण वर्क फ्रॉम होम (Work From Home) काम करत आहे. त्यामुळे लॅपटॉप आणि कम्प्युटर समोर बसून ऑफिसचे काम पूर्ण करणे हा एकच ध्यास अनेकांना लागला आहे. मात्र हेच वर्क फ्रॉम चे काम एखाद्या नवविवाहित जोडप्याच्या (Newly Married Couple) मधुचंद्राच्या रात्रीवर Honeymoon) गदा आणू शकत हे कधी ऐकलं नसेल बाबा! मात्र असं घडलंय.. अशा आशयाचे एक फोटो सध्या सोशल मिडियावर व्हायरल (Viral Photo) होत आहे. या फोटोमध्ये चक्क नवरदेव आपल्या मधुचंद्राच्या रात्री आपल्या नववधूला पाहायचे सोडून कम्प्युटरवर काम करताना दिसत आहे. यावर नेटक-यांनी देखील भरभरून प्रतिक्रिया देत आहेत.
हा फोटो सर्वात आधी 9 फेब्रुवारीला ट्विटरवर पोस्ट करण्यात आला होता. या फोटोमध्ये एक नवविवाहित वधू फुलांनी सजवलेल्या बेडवर साजश्रृंगारात बसलेली दिसत आहे. तर तिच्या समोर तिचा नवरा कम्प्युटरवर काम करताना दिसत आहे. हा फोटो सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. या फोटोला नेटक-यांनी मजेशीर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे.
या फोटोला शेअर करणा-या व्यक्तीने 'थोडं थांब बेब, पहिले मला माझी चॅट हिस्ट्री डिलीट करू दे' असे कॅप्शन दिले आहे. त्यानंतर सर्वांनी या फोटोवर मजेशीर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे.हेदेखील वाचा- Viral video: लग्नात फोटोग्राफरला पतीने फटकारल्यानंतर लोटपोट हसणार्या नववधू चा वायरल व्हिडिओ सोशल मीडियात तुफान गाजला; आता जाणून 'त्या' प्रसंगामागील खरी कहाणी
थांब पहिल्या ट्युटोरियल बघतोय
Hold On Babe
कॉपी पेस्ट
अब्जावधींना वाचवायचे आहे
चेकिंग Twitter Notifications
let me play Brown Munde real quick
week deadline
मागील वर्षी असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. ज्यात नववधू लग्नादरम्यान फोनवर बोलत असताना आणि स्टेजवर लॅपटॉपवर काम करत असताना दिसली होती.