IPL Auction 2025 Live

कोरोना व्हायरस लढाई दरम्यान रोजर फेडररचा किराणा बॅग उचलणारा फोटो व्हायरल; Netizens ने अरबाज खान समजून दिल्या मजेदार प्रतिक्रिया

हा फोटो ट्विटरवर बॉलिवूड निर्माता प्रीतीश नंदी यांनी पोस्ट केले होते. काही जणांना असेही वाटले होते की ते फेडरर नव्हते तर त्याच्या सारखा दिसणारा प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता अरबाज खान आहे.

(@PritishNandy/Twitter)

टेनिस स्टार रोजर फेडररचा (Roger Federer) एक फोटो सोशल मीडियावर प्रसारित केले जात आहे, ज्यात स्विस मास्टर किराणा पिशव्या घेऊन जाताना दिसत आहे. हा फोटो ट्विटरवर बॉलिवूड निर्माता प्रीतीश नंदी (Pritish Nandy) यांनी पोस्ट केले होते. "आपण सर्व यात एकत्र आहोत," नंदीने लिहिले. नंदीच्या या पोस्टमध्ये कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) प्रसारामुळे करण्यात आलेल्या लॉकडाउनमध्ये फेडरर स्वत: 'किराणा दुकानात' जात असल्याचे संकेत दिले. दरम्यान, शेअर केलेला हा फोटो जुना आहे. शांघाय मास्टर्स टेनिस स्पर्धेत भाग घेण्यापूर्वी गेल्या वर्षी चीनच्या शांघाय येथे घेण्यात आला होता. तथापि, नंदीच्या फॉलोअर्सपैकी बर्‍याच जणांनी हा फोटो सर्वात नवीन असल्याचे मानले. काही जणांना असेही वाटले होते की ते फेडरर नव्हते तर त्याच्या सारखा दिसणारा प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता अरबाज खान (Arbaaz Khan) आहे. (व्होडका प्या, ट्रॅक्टर चालवा, कोरोनामुळे कोणी मरणार नाही!'या' देशाच्या राष्ट्रपतींचा नागरिकांना अजब गजब सल्ला)

विशेष म्हणजे ट्विटर यूजरपैकी एकाला हा फोटो नवीन असल्याचे वाटले त्याने त्याच्या मास्कबद्दल विचारपूस केली! सध्या जगभर पसरलेल्या कोरोनाव्हायरसमुळे लोकांना घरी राहण्याचे आणि बाहेर जाताना मास्क घालून बाहेर पाडण्याचे सक्तीचे आदेश देण्यात आले आहे.

पाहा प्रीतीश नंदीचे ट्विट

अरबाज खान

फेडरर, रॉजर फेडरर!

आघाडीच्या वर्तमानपत्राचे कार्यकारी संपादक सचिन काळबाग यांनी नंदीने शेअर केलेला फोटो जुना असल्याचे पटकन लक्षात आणून दिले. “हा जुना फोटो आहे, लॉकडाउनचा नाही. "फेडररने बऱ्याच महिन्यांपूर्वी आपल्या इन्स्टाग्रामवर हा शेअर केला होता," काळबाग यांनी ट्विट केले.

वास्तव!

फोटो 2019 चा आहे

ऑक्टोबर 2019 मध्ये हा फोटो घेण्यात आला होता कारण फेडरर प्लास्टिक नसलेल्या पिशव्या वापरण्यास प्रोत्साहन करत होता. त्याच दरम्यान घेतलेल्या आणखी एका फोटोमध्ये स्पष्टपणे कॅप्शन दर्शविले गेले आहे: किराणा पिशव्यावर लिहिलेले "आणखी प्लास्टिक पिशव्या" नाही.

Photo Credits: canalnet.tv

अलीकडेच घरातील सेल्फ-क्वारेन्टीन दरम्यान फेडररने त्याच्या चाहत्यांना आणि इतर क्रीडा सेलिब्रिटींना व्हॉली चॅलेंन्जचे आव्हान केले होते. यात त्याने भारताचा कर्णधार विराट कोहलीलाही टॅग केले होते.