Vi Ad Funny Memes:Vodafone-Idea च्या नव्या रिब्रॅन्डिंग Viजाहिरातीला कंटाळलेल्यांचे सोशल मीडियात धम्माल मिम्स व्हायरल
कालपासून तुम्ही जर टीव्ही चॅनेल सर्फिंग करत असाल तर व्होडाफोन आणि आयडिया या दोन टेलिकॉम कंपन्यांनी एकत्र येऊन सुरू Vi हा ब्रॅन्ड लॉन्च केला आहे, त्याची एक जाहिरात सुरू आहे.
कालपासून तुम्ही जर टीव्ही चॅनेल सर्फिंग करत असाल तर व्होडाफोन आणि आयडिया या दोन टेलिकॉम कंपन्यांनी एकत्र येऊन सुरू Vi हा ब्रॅन्ड लॉन्च केला आहे, त्याची एक जाहिरात सुरू आहे. दरम्यान त्यामध्ये सतत केवळ Vi.. Vi.. असंच म्हटलं जात आहे. त्यामुळे अनेकजण कंटाळले आहेत. सध्या लॉकडाऊनमुळे अनेक जण घरीच आहेत. टीव्ही सुरूच आहे आणि कोणतही चॅनेल असेल तरी लोकांना ही अॅड ऐकायला मिळत असल्याने लोकं त्रस्त झाले आहेत. काही याला 'Irritating जाहिरात' म्हटलं आहे. टेलिव्हिजनवर ही जाहिरात प्रसारित होत असली तरीही लोकांना सातत्याने ती कानावर पडत असल्याने त्याला वैतगलेल्या अनेकांनी सोशल मीडियात आपला त्रागा मांडला आहे. आणि मजेशीर ट्वीटसच्या माध्यमातून राग देखील व्यक्त केला जात आहे.
Vi जाहिराती विरूद्ध धम्माल मिम्स
धमकी
टीव्ही फोडणार?
किती इवळत असतात vi vi
VI ची जाहिरात थांबवा
2018 सालीच आयडिया आणि व्होडाफोन कंपनी एकत्र आल्या होत्या. मात्र काल पहिल्यांदा त्यांनी रिब्रॅन्डिंग करत व्होडाफोन मधून V आणि आयडियाचा I एकत्र करून Vi हा ब्रॅन्ड बनवला आहे. कालच त्यांनी दोन्ही टेलिकॉम कंपन्यांच्या ग्राहकांना नव्या साईटवर रिडिरेक्ट केले आहे. आता हा ब्रॅन्ड जनसामान्यांपर्यंत पोहचवण्यासाठी संध्याकाळपासून जाहिरात सुरू झाली आहे. पण ती फारशी लोकांना रूचलेली नाही.
काही वर्षांपूर्वी व्होडाफोनने झू झू हे कॅरेक्टर आणले होते. ते जगभरात प्रसिद्ध झाले होते. मात्र त्यातुलनेत Vi वर टीका होत आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)