Panipuri Ban in Kathmandu: नेपाळ सरकारने काठमांडूमध्ये पाणीपुरीवर घातली बंदी; जाणून घ्या काय आहे यामागच कारण
खोऱ्यातील ललितपूर महानगरात कॉलराच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
Panipuri Ban in Kathmandu: नेपाळ सरकार (Nepal Government) ने राजधानी काठमांडू (Kathmandu) मध्ये अशी बंदी घातली आहे, जी ऐकून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. खरं तर, इथे आरोग्य मंत्रालयाने काठमांडूच्या एलएमसीमध्ये पाणीपुरीवर बंदी घातली आहे. खोऱ्यातील ललितपूर महानगरात कॉलराच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. पाणीपुरीमध्ये वापरण्यात येणाऱ्या पाण्यात कॉलराचे बॅक्टेरिया आढळून आल्याचा दावा करण्यात आला आहे.
महापालिका पोलिस प्रमुख सीताराम हचेतू यांनी दिलेल्या माहितीनुसार, गजबजलेल्या भागात आणि मार्गिका परिसरात पाणीपुरी विक्रीवर बंदी घालण्यासाठी सर्व तयारी करण्यात आली आहे. पाणीपुरीमुळे कॉलराच्या रुग्णांमध्ये वाढ होण्याचा धोका असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. रविवारी काठमांडूमध्ये कॉलराचे सात नवीन रुग्ण आढळून आले. त्यामुळे घाटीतील एकूण रुग्णांची संख्या 12 झाली आहे. (हेही वाचा -Sanpada Bike Accidents Factcheck: 'तो' व्हिडिओ सानपाडा येथील नव्हे; पाकच्या कराची शहरातील दृश्य सोशल मीडियावर व्हायरल)
नेपाळच्या आरोग्य मंत्रालयाच्या अंतर्गत एपिडेमियोलॉजी आणि रोग नियंत्रण विभागाचे संचालक चमनलाल दास यांनी सांगितले की, काठमांडू महानगरात कॉलराची पाच प्रकरणे आढळून आली आहेत. याशिवाय चंद्रगिरी नगरपालिकेत एक आणि बुऱ्हाणिकांत नगरपालिकेत एक प्रकरण आढळून आले. दरम्यान, आरोग्य मंत्रालयाने लोकांना कॉलराची लक्षणे दिसू लागताच जवळच्या रुग्णालयात संपर्क साधण्याचा सल्ला दिला आहे.
पावसाळ्यात आणि उन्हाळ्यात पसरणाऱ्या अतिसार, कॉलरा यांसारख्या जलजन्य आजारांपासून सावध राहण्याचे आवाहन नेपाळ सरकारने केले आहे.