Nagaland Minister Temjen Imna Along यांनी Govinda Meme शेअर करत वायरल झालेल्या ट्वीट बाबत मानले नेटिझन्सचे आभार

41 वर्षीय Temjen Imna Along हे नागालँड भाजपचे प्रदेशाध्यक्ष देखील आहेत.

Temjen Imna Along । PC: Twitter

सध्या आपल्या 'Sense of Humour' आणि 'Witty Responses' मुळे कुणी चर्चेत असलेला देशपातळीवरील राजकारणी असेल तर तो Nagaland चे मंत्री Temjen Imna Along आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी ईशान्येकडील लोकांचे बारीक डोळे आणि त्याचा राजकारणी म्हणून होणारा फायदा यावरून केलेली टीपण्णी असू दे किंवा त्यांचे अनेक मजेशीर अंदाजातील ट्वीट असु दे सध्या ट्वीटर सोबतच त्यांची सोशल मीडीयात चर्चा आहे. लोकाग्रहास्तव ते लवकरच अजून एक मजेशीर व्हीडिओ पोस्ट करणार आहेत असे देखील त्यांनी सांगितले आहे.

कालच्या 'जागतिक लोकसंख्या दिनी' त्यांनी असाच एक सल्ला शेअर केला आणि त्याच्यावर लोकांचा मिळालेला तुफान प्रतिसाद पाहता त्यांनी अभिनेता गोविंदा याचा 'इतनी खुशी' चा जिफ शेअर केला आहे. यासोबतच त्यांनी देशभरातून मिळणार्‍या प्रेमाचा स्वीकार करत याबद्दल मी कृतज्ञ असल्याचंही स्पष्ट केले आहे.

Temjen Imna यांनी 'बारीक डोळ्या'वरून एका भाषणात केलेला उल्लेख विशेष गाजला होता. सोशल मीडीयात हा व्हिडिओ शेअर झाला आणि बघता बघता वायरलही झाला होता. आसाम चे मुख्यमंत्री Himanta Biswa Sarma यांनी देखील तो शेअर केला होता.

हा व्हिडिओ वायरल झाल्यानंतर त्यांचे ट्वीटसही गाजले. Temjen Imna या राजकारणी असलेल्या व्यक्तिमत्त्वाचे सोशल मीडीयात फॅन्स देखील वाढले आहेत.

Temjen Imna Along हे नागालॅंड राज्याचे उच्च शिक्षणमंत्री आणि ट्रायबल अफेअर्स मिनिस्टर आहेत. 41 वर्षीय Temjen Imna Along हे नागालँड भाजपचे प्रदेशाध्यक्ष देखील आहेत. 2018 च्या विधानसभा निवडणुकीत ते अलंग टाकी मतदारसंघातून निवडून आले आहेत.